HW News Marathi
महाराष्ट्र

“मॉलमध्ये हॉस्पिटल या आधी कधीच पाहिलं नाही,” भांडूपच्या आगीनंतर महापौरांचं वक्तव्य

मुंबई | मुंबईत भांडुपमध्ये कोरोना रुग्णालयाला भीषण आग लागली असून ९-१० तासानंतरही आग विझवण्याचे अथक प्रयत्न सुरुच आहेत. कोरोना रुग्ण दाखल असणाऱ्या या रुग्णालयात लागलेल्या आगीत २ जणांचा मृत्यू झाला असून काहीजण अडकल्याची भीती आहे. जवळपास ७० कोरोना रुग्णांची रुग्णालयातून सुटका करण्यात आली आहे. मॉलमध्ये असणाऱ्या रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही गंभीर बाब असल्याचं म्हटलं आहे.

भांडुपमध्ये रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास ड्रीम्स मॉल सनराइज हॉस्पिटलमध्ये ही आग लागली. मुंबईत एकीकडे करोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत असतानाच आग लागल्याची ही घटना घडली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरदेखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. “पहिल्यांदाच मी मॉलमध्ये रुग्णालय पाहत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. ७ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. ७० रुग्णांना इतर रुग्णालयात नेण्यात आलं आहे. आगीचं कारण जाणून घेण्यासाठी तपास केला जाईल,” असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. “आगीमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. रात्री १२.३० वाजता रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. अग्निशमन दलाच्या २२ ते २३ गाड्या घटनास्थळी उपस्थित आहेत,” अशी माहिती पोलीस अधिकारी प्रशांत कदम यांनी एएनआयला दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गृहमंत्री पदाच्या बदलीच्या चर्चेवर कॉंग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून ५जणांचा मृत्यू तर ५ जखमी; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Aprna

सीकेपी बँकेचा RBI ने केला परवाना रद्द

News Desk