HW News Marathi
महाराष्ट्र

“मी कुणालाही शुर्पणखा म्हटलेलं नाही”, चित्रा वाघ याचं स्पष्टीकरण!

मुंबई। राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून सध्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या महिला आघाडीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सकाळी केलेल्या एका ट्वीटची चर्चा राजकीय वर्तुळात बरीच रंगली होती. “राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका” असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं होतं. हा अप्रत्यक्षपणे रुपाली चाकणकर यांनाच टोला असल्याचं बोललं गेलं. त्यावर रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर देखील दिल्यानंतर आता चित्रा वाघ यांनी स्वत:च आपल्या ट्वीटबद्दल खुलासा केला आहे.

मी फक्त एवढंच म्हटलं त्या पदावर जे कोणी बसेल त्यांनी शूर्पणखाच्या भूमिकेत जाऊ नये

राज्य महिला आयोगासाठी अध्यक्ष लवकर नेमावा, पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका अशा प्रकारचं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं होतं. त्यांचा रोख हा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. त्यावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, “राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अद्याप कोणाच्याही नावाची घोषणा झाली नाही. मी फक्त एवढंच म्हटलं त्या पदावर जे कोणी बसेल त्यांनी शूर्पणखाच्या भूमिकेत जाऊ नये. कोणीही तिथे बसेल त्यांनी रावणाला साथ देऊ नये. आता माध्यमांनी याचा चुकीचा अर्थ घेत ते रुपाली चाकणकरांना उद्देशून असल्याच्या बातम्या चालवल्या. पण मी कोणाचंही नाव घेतला नाही.”

अनेक मोठे प्रश्न असताना इतर क्षुल्लक गोष्टींवर लक्ष द्यायला वेळ नाही

चित्रा वाघ यांच्या ट्वीटवर रुपाली चाकणकर यांनी देखील थेट टीका न करता अप्रत्यक्ष शब्दांतच निशाणा साधला आहे. “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप मोठे प्रश्न आहेत. आत्ता कुठे राज्यातली जनता सावरतेय. अनेक मोठे प्रश्न असताना इतर क्षुल्लक गोष्टींवर लक्ष द्यायला वेळ नाही. एक जबाबदार नागरीक म्हणून आपली भूमिका निभावणं महत्त्वाचं आहे”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सामाजिक न्याय विभाग अभिनव पद्धतीने साजरी करणार! – धनंजय मुंडे

News Desk

तर गरज पडल्यास भाजपमध्ये प्रवेश करु…बच्चू कडूंचे मोदींना आव्हान!

News Desk

JNU मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरून वाद; काय आहे नेमके प्रकरण

Aprna