HW News Marathi
महाराष्ट्र

“मी पोहोचलो रे हिमालयात”; महाविकास आघाडीने चंद्रकांत पाटलांना डिवचलं

कोल्हापूर | संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. कोल्हापूर निवडणुकीत १५ उमेदवार जरी या उभे राहिले असले तरी आटीतटीचा सामना रंगला होता तो भाजप आणि कॉंग्रेस यांच्यातच! भाजपकडून सत्यजीत कदम तर कॉंग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव या निवडणुकांच्या रणसंग्रामात आमने सामने आले होते. मात्र, ही निवडणूक खऱ्या अर्थाने मोठी ठरली होती, कारण अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा यात पणाला लागली होती. आता या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून पुन्हा एकदा यात कॉंग्रेसनं मैदान मारलं आहे. 

मुख्यमंत्र्यांपासून विरोधी पक्षातील सर्वच नेत्यांनी या निवडणुकीच्या प्रचारात उडी घेतली होती. या सर्व पार्श्वभूमीमुळे सर्वांचंच लक्ष या निवडणुकांच्या निकालाकडे लागलं होतं. कॉंग्रेसने या निवडणुकांमध्ये बाजी मारलीच आहे. मात्र, यामध्ये आणखी एका विषयाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे आणि ते म्हणजे चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार का? असा प्रश्न विचारण्यात येतोय. खरंतर या निवडणुका लागताच प्रचार सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक मोठं विधान केलं होतं. कोल्हापुरात जर भाजपचा पराभव झाला तर मी हिमालयात जाणार, अशी घोषणा चंद्रकांत पाटलांनी केली होती. याआधी पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला होता. पाचपैकी चार राज्यात भाजपने सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे निश्चितच भाजपचा आत्मविश्वास बळावला आहे. मात्र असं जरी असलं तरी कोल्हापुरात भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. 

कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजपने शर्तीचे प्रयत्न केले होते. या निवडणुकीत भाजपकडून सत्यजीत कदम आणि कॉंग्रेसकडून जयश्री जाधव या जरी उमेदवार होत्या असल्या तरी ही खरी लढत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातच होती. त्यात पाटलांच्या “मी हिमालयात जाईन” या वक्तव्याने मोठी रंगत आणली होती. पण, आता भाजपचा म्हणजे चंद्रकांत पाटलांचा पराभव झालेला पाहता आता महाविकास आघाडी पाटलांच्या वक्तव्यावरून त्यांना चांगलीच डिवचताना दिसून येतेय. इकडे कॉंग्रेसने मैदान मारलं आणि तिकडे चंद्रकांत पाटलांचे बॅनर सुद्धा झळकले. “मी पोहोचलो रे हिमालयात” अशा आशयाचे बॅनर झळकू लागले आहेत. तर या बॅनरवर पाटील हे हिमालयात बसल्याचे दाखवण्यात आले आहे. 

कोल्हापूर पोटनिवडणुकांच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रकांत पाटलांच्या “मी हिमालयात जाईन”च्या वक्तव्यावरून टोला लगावला आहे. आव्हाड यांनी चंद्रकांत पाटलांचा हिमालयात बसल्याचा फोटो ट्वीटरवर शेअर केला असून या फोटोला त्यांनी या फोटोला “नको परत या…” असं कॅप्शन देखील दिले आहे. तसेच या फोटोमध्ये पाटलांच्या समोर कमळाचं फूलही आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी आंदोलनामुळे गेलेली पत सुधारण्यासाठी भाजपने पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली! – नाना पटोले

Aprna

“मुख्यमंत्री पांढऱ्या पायाचे आहेत का? पाहायला पाहिजे”; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

News Desk

‘मुख्यमंत्र्यांसोबत संजय राऊतांची तासभर चर्चा’, तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करणार!

News Desk