मुंबई | लॉकडाऊनमुळे राज्यात अडकून पडलेले मंजूर आणि कामगार यांना आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वच्या ज्यादा गाड्या सोडाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. पवारांनी ट्वीट करत रेल्वे मंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती दिली आहे.
Had a telephonic conversation with Shri @OfficeofUT – Chief Minister of Maharashtra and Shri @PiyushGoyal – the Union Railway Minister regarding the issue of migrant workers.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 9, 2020
या मंजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याची पवारांनी सांगितले. महाराष्ट्रात अडकेल्या मंजुरांनाच्या मूळगावी नेहण्यासाठी एसटी बस वाहतुकीची व्यवस्था केली आहे. मात्र, महाराष्ट्रातून मूळ गावी केलेल्या मंजुरांना काही राज्यांनी घेन्यास नकार दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी, असे आवाहन पवारांनी ट्वीट करत पंतप्रधानांकडे केली आहे.
I humbly request our @PMOIndia Shri. Narendra Modi ji to intervene in this matter by talking to the CMs of the respective states who are not allowing these people to come back home.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 9, 2020
स्थलांतरित मंजुरांना ११ मेपासून मोफत एसटी प्रवास
श्रमिक आणि कामगारांना सोमवारपासून (११ मे) एसटीतून मोफत त्यांच्या गावी नेहण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज (९ मे) दिली आहे. एका बसमध्ये केवळ २२ लोकांना त्यांच्या मूळगावी सोडणार असून ही सविधा १८ मेपर्यंत असल्याची माहिती परब यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.