HW News Marathi
महाराष्ट्र

गणेश नाईक आयत्या वेळी पक्ष सोडतील असे मी सांगितले होतेच !

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक जण सध्या भाजपच्या वाटेवर आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता राष्ट्रवादीच्या गणेश नाईक यांच्या राजीनाम्याच्या आणि भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगत आहेत. दरम्यान, याविषयी प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “गणेश नाईक यांनी पक्षाची वाट लावली आहे. ते ५ वर्षांत पक्ष साफ करतील आणि आयत्या वेळी पक्ष सोडून जातील असे मी वारंवार सांगितले होते. परंतु, पक्षाने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. अखेर मी जी भीती व्यक्त केली होती तेच झाले आहे”, असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. म्हणाले.

”गणेश नाईक यांनी पक्षवाढीसाठी कोणत्याही प्रकारचे योगदान दिलेले नाही. राज्यात सत्ता असताना देखील कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मिरा-भायंदरमध्ये ताकद असताना देखील पक्ष वाढला नाही. २०१४ सालीच गणेश नाईक राष्ट्रवादी सोडणार होते. जेव्हा शरद पवारांचे ऑपरेशन सुरू होते. त्यावेळी गणेश नाईक गुप्त बैठकांमध्ये गुंतले होते. मी पक्षाला वारंवार सांगितले होते कि आयत्या वेळी पक्ष सोडून जातील. परंतु, पक्षाने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील! – देवेंद्र फडणवीस

Aprna

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १६९ मतांनी विश्वासदर्शक ठराव मंजूर

News Desk

मुंबईत २ आयुक्त नेमण्याची कॉंग्रेसची मागणी, तर कॉंग्रेसचा डाव यशस्वी न होऊ देण्याचा भाजपचा इशारा

News Desk