HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मला खडसेंच्या उमेदवारीची अपेक्षा होती,पण…

HW Exclusive गौरी टिळेकर | पक्षावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपने पुन्हा एकदा तिकीट नाकारले आहे. खडसे यांना डावलून भाजपने राज्यसभेचा उमेदवार म्हणुन औरंगाबादचे  भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर डाॅ. भागवत कराड यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. कराड यांच्या उमेदवाराने भाजपच्या नेत्यांच्याही भुवया उंचावलेल्या आहेत.

आज १२ फेब्रुवारीला अधिवेशनादरम्यान पंकजा मुंडे यांना खडसेंच्या उमेदवारीबाबत विचारले असता ,मला खडसेंच्या उमेदवारीची अपेक्षा होती परंतु पक्षाने घेतलेला निर्णय योग्य असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी एचडब्ल्यू मराठीशी बोलताना दिली आहे. पक्षावर नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे बीडमधील एका कार्यक्रमात आपली भाजपविषयीची नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती , त्याचवेळी पंकजा मुंडेंसुद्धा पक्षावर नाराज असल्याचं बोललं जात होतं,त्यामुळे आता खडसे पुन्हा नाराज झाले तर आपण त्यांना भेटून त्यांची समजूत काढू असेसुद्घा पंकजा मुंडे म्हणाल्या.

 

Related posts

गावात जास्त घोळक्याने लोक आले तर गावकऱ्यांनी पोलिसांकडे माहिती द्यावी

rasika shinde

युती झाली तर आम्ही किरीट सोमय्यांसाठी प्रचार करणार नाही !

News Desk

#Article370Abolished : सरकारचा ‘हा’ निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्याविरोधात !

News Desk