HW News Marathi
महाराष्ट्र

लोकसभेमध्ये उमेदवार निवडण्यात माझ्याकडून चूक झाली !

सातारा। लोकसभेमध्ये माझ्याकडून चूक झाली, हे मी जाहीर सभेत मान्य करतोय, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्याचे माजी खासदार आणि भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार यांनी भर पावसात सभा न थांबविता भोसले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर सडकून टीका केली. शरद पवार यांनी काल (१८ ऑक्टोबर) साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या समर्थन भर पावसात प्रचार सभा घेतली.

“एखाद्या माणसाकडून चूक झाली की, त्याने ती चूक कबुल करायची असते. लोकसभेमध्ये उमेदवार निवडण्यामध्ये माझ्याकडून चूक झाली, हे मी जाहीर सभेत मान्य करतोय, पण आता ती चूक सुद्धरविण्यासाठी साताऱ्यातील घराघरातील प्रत्येक तरुण आणि वडील धारी व्यक्ती २१ तारखेची वाट बघत आहे. आपल्या मतांनी निर्णय देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना भरगोस मतांनी विजयी करण्याचे भर पावसात सभा संबोधित करत उपस्थितांना आवाहन केले. “

कुस्ती आणि पैलवान हा भाजपच्या तोंडात न शोभणारा विषय आहे !

पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊ गेले आणि एका बाजुला मुख्यमंत्री म्हणतात मला निवडणुकीत काही दिसतच नाही, ते म्हणतात या निवडणुकीत दुसऱ्या बाजुला कोणी पैलवान दिसत नाही, मी त्यांना जाहीर पणे सांगितले. पण या तालुक्यातमध्ये उत्तम पैलवान तयार करणारे आमचे सहकारी आहे. कुस्ती आणि पैलवान हा भाजपच्या तोंडा न शोभणारा विषय आहे, असे म्हणत पवारांनी मुख्यमंत्री आणि भाजपवर बरसले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेट्रो कारशेड प्रकल्पा विषयी मुख्यमंत्री जनतेची दिशाभूल करतायत, किरीट सोमय्या यांचा आरोप

News Desk

महाविकासआघाडी सरकारमध्ये पुन्हा नाराजी, काँग्रेस नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र तर सोनिया गांधींचीही घेणार भेट

Aprna

औरंगाबादच्या नामांतरावरुन मराठा समाज आक्रमक, बाळासाहेब थोरातांच्या फोटोला मारले जोडे

News Desk