HW News Marathi
महाराष्ट्र

जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही- गोपीचंद पडळकर

मुंबई। गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर बनू लागला आहे. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेले असताना दुसरीकडे राज्य सरकारकडून ३५० कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच, राज्य सरकारने त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे.याच पार्श्वभूमीवर आज(११ नोव्हें)भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक सूचक ट्विट केले असून त्यामध्ये ‘जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही’, असे ते म्हणाले आहेत. तसेच काल रात्री एसटी कर्मचाऱ्यांसमवेत जेवण करुन आझाद मैदानावरच मुक्काम केला असल्याचीही माहिती यावेळी पडळकरांनी दिली. या ट्विट सोबतच #लढा_विलिनीकरणाचा या हॅशटॅगचा वापर त्यांनी केला आहे.

पडळकर आणि सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली

दरम्यान, काल भाजपच्या नेत्यांनी एसटी कामगारांच्या प्रश्नासाठी मंत्रालयावर मोर्चा काढला. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अटक केली. त्यावेळी मोर्चासाठी मंत्रालयाकडे जात असताना गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्यांना मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

शिष्टमंडळ राज ठाकरेंची भेटघेणार

एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ गुरुवारी सकाळी ११ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ राज ठाकरेंची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या मगाण्यांसदर्भात माहिती आणि आंदोलनाला पाठींबा देण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. मात्र मनसेने यापूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा जाहीर केला आहे. ठाकरेंनी आपले वजन वापरुन शासनाकडे पाठपुरावा करण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकवले आहे. एसटी तोट्यात असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही परिणाम झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत २६ मार्चपासून आयपीएल-२०२२ चे आयोजन; मंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा

Aprna

धान खरेदी केंद्राचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

खडसेंच्या राष्ट्रवादीच्या येण्याच्या निर्णयावर अजित पवार नाराज ?

News Desk