पुणे । राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही नियंत्रणात आलेला नाही. या कोरोनाच्या विळख्यातून कोणीही सुटलेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील सनदी अधिकारी आणि आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचे आज (१० ऑक्टोबर) पुण्यात कोरोनामुळे निधन झाले आहे. या बातमीनंतर सर्वच स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे. अवघ्या ३४ वर्षांचे होते.
सुधाकर शिंदे यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नांदेडहून पुण्याला आणण्यात आले होते. ते नुकतेच १५ दिवसांच्या सुट्टीसाठी त्रिपुराहून नांदेडला आले होते. प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर प्रथम नांदेड आणि त्यानंतर औरंगाबादमध्ये उपचारांसाठी हलविण्यात आले होते. मात्र, तरीही प्रकृती अधिकच चिंताजनक होऊ लागल्याने त्यांना पुण्यात आणण्यात आले होते.
IAS ऑफिसर सुधाकर शिंदे यांच्या निधनाच्या बातमीनंतर त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लबकुमार देव यांनीही ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. “सुधाकर शिंदे यांच्या निधनाने त्रिपुराने एक मृदु स्वभावाचा कर्तबगार अधिकारी गमावला आहे. ही राज्याची मोठी हानी आहे”, असे मुख्यमंत्री बिप्लबकुमार देव आपल्या ट्विटमध्ये म्हणतात.
Deeply shocked and saddened by sudden demise of Sudhakar Shinde,IAS,Tripura cadre.
He succumbed to Covid 19 in Nanded. He was one of the finest,gentle & exceptional officer, it's a big loss for the state.
Spoke to his wife to offer my deepest condolences to her & family
Om Shanti pic.twitter.com/RgclZ8F4Am— Biplab Kumar Deb (@BjpBiplab) October 9, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.