HW News Marathi
Covid-19

बीड नगर परिषद प्रशासनाच्या भाजी-फळ विक्रेत्यांवरील कारवाईचा संदीप क्षीरसागर यांच्याकडून निषेध

बीड | बीड शहरात आज (११ मे) शासनाने जाहीर केली आहे. या जिल्ह्य प्रशासनाच्या नियमानुसार वेळेत भाजीपाला व फळविक्रीसाठी रस्त्यावर आलेल्या विक्रेत्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता, विनाकारण बीड नगर परिषद प्रशासनाने त्यांच्या भाजीपाला, फळ, हातगाड्यांवर जप्ती आणली, असा आरोप भाजीविक्रेत्यांनी केला आहे.

या कारवाईमुळे हतबल झालेल्या विक्रेत्यांचा अक्षरशः रडू आले, या घटनेची माहिती मिळताच, आमदार संदीप क्षिरसागर यांनी विक्रेत्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. आणि तातडीने बीड नगर परिषद कार्यालयात भेट देऊन उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांना नियमात राहून व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही विक्रेत्याला यापुढे त्रास देण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा दिला.

तसेच जे लोक नियमाच्या विरोधात जाऊन रस्त्यावर येऊन व्यवसाय करत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी सूचना देखील केली. हातावर पोट असणाऱ्या सामान्य विक्रेत्यांना त्रास देणे हे अतिशय वेदनादायी आहे. बीड नगर परिषद प्रशासनाच्या आजच्या भूमिकेचा त्यांनी निषेध केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगभरात १० लाख लोकांना कोरोनाची लागण !

News Desk

राज्यात आज ५,५३७ नवे कोरोना रुग्ण, तर १९८ जणांचा मृत्यू

News Desk

मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील, रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयाकडे लक्ष 

News Desk