HW News Marathi
महाराष्ट्र

बंटी आणि बबली पोहोचले असतील तर येऊ द्या, स्टंट करणे हे त्यांचे काम!, राऊतांचा राणा दाम्पत्यांना टोला

मुंबई | “बंटी आणि बबली पोहोचले असतील तर येऊ द्या. हे फिल्मी लोक आहेत. हे स्टंट करणे ही त्यांचे काम आहे,” अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांच्यावर केली आहे. राणा दाम्पत्यांनी पोलिसांना हुलकावणी देत एक दिवस आधीच मुंबईत दाखल झाले आहेत. राणा दाम्पत्य विमानाने मुंबईत दाखल झाले आहेत. राणा दाम्पत्य उद्या (२२ एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थाना समोर हनुमान चालिसाचे पठण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राऊत म्हणाले, “बंटी आणि बबली पोहोचले असतील तर येऊ द्या. हे फिल्मी लोक आहेत. हे स्टंटबाजी, मार्केटिंग करणे त्यांचे काम आहे. आणि भाजपला हिंदुत्वाच्या मार्केटिंगसाठी अशा लोकांची गरज लागत आहे. आणि हिंदुत्वाला मार्केटिंग करण्याची गरज नाही. आम्हाला माहिती आहे हिंदुत्व काय आहे. राम नवमी, हनुमान चालिसा असो ही काय स्टंटबाजी नाही, श्रद्धेची आणि भावनेची विषय आहे. या लोकांना करायचे असेल तर करू द्या.  

“सिनेमातले लोके आहे ते त्यांना स्टंट करू द्या.स्टंटनी काही फरक पडत नाही. त्यांना मुंबईचे शिवसेनेचे पाणी माहिती नाही,” असा टोला राऊतांनी राणा दाम्पत्यांना लवगाला आहे.  राऊत पुढे म्हणाले, ” पण करू द्या, त्यांना स्टंट काय करायचे आहे ते. आमचे शिवसैनिक सक्षम आहेत. हनुमान चालिसा वाचणे आणि रामनवमी साजरी करणे. हे श्रद्धेचे विषय आहेत. नक्की हे धार्मिक आणि श्रद्धेचे विषय आहेत. पण हे नौटंकी आणि स्टंटचे विषय नाहीत. अलीकडे भाजपने हिंदुत्वाची  नौटंकी आणि स्टंट करुन ठेवले आहे. त्यातली ही सर्व पात्रे आहेत. ही सर्व स्टंटमधील पात्र आहेत. लोक यांच्या हिंदुत्वाला गांभीर्याने घेत नाहीत. हनुमान चालिसा, रावमी आणि इतर सण-उत्सव असेल. यादेशामध्ये, राज्यात सर्व सण आम्ही साजरे करतो. यांचा जेव्हा हिंदुत्वाशी काही संबंध नव्हता, तेव्हा आम्ही वेगवेगळा शोभा यात्रा, गुढीपाडवापासून दसऱ्यापर्यंत हे काय आम्हाला शिकवत आहेत. यांना स्टंक करू द्या, काही हरकत नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंच्या सभेसाठी पुण्यात मिळाले मैदान

News Desk

 हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये | यशोमती ठाकूर

News Desk

शिवसेनाच ठरविणार देशाचा पुढील पंतप्रधान !

News Desk