HW News Marathi
महाराष्ट्र

“जर मुंडे दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी आमची” – शरद पवार

गोवा | सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपामुळे विरोधकांनी त्यांच्याजर मुंडे दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी आमची राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तूर्तास राजीनामा घेणार नसल्याचं सांगितल्यावर भाजप नेत्यांनी पवारांना लक्ष्य केलं आहे. मात्र शरद पवारांनी यावर विरोधकांना उत्तर दिलं आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपांवर आपला मुळीच विश्वास नाही. या प्रकरणाची चौकशी होऊ द्या आणि जे काही सत्य असेल ते बाहेर येऊ द्या. जर मुंडे दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी आमची असल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे

संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य म्हणून पवार सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी तेथील राष्ट्रवादीच्या कार्यालयाला शरद पवारांनी भेट दिली. दरम्यान, काही जणांचा बिनबुडाचे आणि निराधार आरोप करण्याचा व्यवसाय बनला आहे, असं म्हणत पवारांनी टीकाकारांना टोला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात दिवसभरात ८ हजार १९६ रुग्ण कोरोनामुक्त १५८ रूग्णांचा मृत्यू!

News Desk

नाताळ अन् नवीन वर्षासाठी राज्य सरकारकडून नवे निर्बंध

Aprna

पवारांची चप्पल उचलणारे चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत आहेत – निलेश राणे

News Desk