मुंबई । शिवसैनिकांनी मारहाण केलेले निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी भेट घेतली. रामदास आठवलेंसोबतच्या या भेटीनंतर “उद्धव ठाकरेंना सरकार चालवता येत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे”, अशी मागणी मदन शर्मा यांनी केली आहे. दरम्यान, शिवसैनिकांच्या या कृत्यामुळे राजकीय वर्तुळासह सर्वच स्तरांतून मोठी टीका होत आहे.
सोशल मीडिया मे पोस्ट फॉरवर्ड करने के आरोपसे हुये हमले में जखमी रिटायर्ड नेव्ही ऑफिसर श्री मदन शर्माजी से उनके निवासस्थानपर जाकर उनसे मुलाकात की।उन्हे केंद्र सरकारकी तरफसे वाय प्लस दर्जा की सिक्युरिटी दिलाने के लिये प्रयास करेंगे। @AmitShah pic.twitter.com/gOC9ywu3Wm
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 13, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र फॉरवर्ड केल्यामुळे शिवसैनिकांनी या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला जबर मारहाण केल्याने राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. “मला ४ वेळा फोन करून शिवसैनिकांनी बोलण्यासाठी बोलावले. पण मी गेल्यावर मला मारहाण केली. मी पोस्ट फॉरवर्ड केली. पण उदय महेश्वरी यांनी ते व्यंगचित्र काढले आहे. तरीही त्यांना पकडायचे सोडून मला पकडले ही त्यांची क्रिएटीव्हीटीच आहे”, असा टोला मदन शर्मा यांनी लगावला आहे.
“संपूर्ण देश म्हणणे हे महाराष्ट्रातील विद्यमान महाविकासआघाडी सरकार बदलले पाहिजे. जर उद्धव ठाकरे यांना सरकार चालवता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. राज्यात निर्माण झालेल्या गढूळ वातावरणामुळे राष्ट्रपती राजवट लागू करावी. कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवणारे सरकार निवडू द्यावे. पोलिसांवर दबाव असल्याने हे सगळे मोकळे सुटले. संबंधित आरोपींवर हत्येच्या प्रयत्नाची केस झाली पाहिजे”, अशी मागणी मदन शर्मा यांनी केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.