HW News Marathi
महाराष्ट्र

“हे पद जर मला मिळालं असतं तर आपण कोकणचा कायापालट केला असता” – दीपक केसरकर

सिंधुदुर्ग। नारायण राणे यांना मिळालेले मंत्रिपद हे केंद्रातील सगळ्यात मोठं मंत्रिपद आहे. त्याचा उपयोग त्यांनी कोकणसाठी आणि कोकणी जनतेसाठी करावा. हे पद जर मला मिळालं असतं तर आपण कोकणचा कायापालट केला असता, असं नारायण राणेंचे कट्टर विरोधक माजी मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय. नारायण राणेंनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करून जे मंत्रिपद मिळवलं आहे. त्याच्या माध्यमातून कोकणचा काया पालट करावा ते त्यांच्या हातात आहे. त्यांनी जर विकास केला तर आम्ही त्यांचे निश्चितच कौतुक करू, अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर म्हणाले.

कोणी टीका करू नये

एका मराठी अधिकाऱ्यावरून शिवसेनेची भूमिका मराठी माणसाविरोधात आहे, अशी कोणी टीका करू नये. आम्हाला त्या मराठी अधिका-याबद्दल आदर आहे. त्या अधिकाऱ्याने आपलं कर्तव्य पार पाडावे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. मात्र, उगाचच एका व्यक्ती वरून शिवसेनेच्या मराठी भूमिका विषयी कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये, असा सणसणीत टोला माजी गृह राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी भाजपला लगावला आहे.

ड्रग्ज या देशातून हद्दपार झाले पाहिजे

50 ग्रॅम 100 ग्रॅम ड्रग्ज पकडायचे आणि सेलिब्रिटींच्या छोट्या-मोठ्या मुलांना उभं करायचं आणि त्यांना या प्रकरणात अडकावयच. ड्रग्ज या देशातून हद्दपार झाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. यासाठी गुजरात वरून येणाऱ्या ड्रग्स रॅकेट आधी उध्वस्त करा, असं दीपक केसरकर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाभारतात जसे शिखंडी होते, तसं किरीट सोमय्या हे शिखंडीच्या भूमिकेत, महापौरांची गंभीर टीका

News Desk

राज्यातील तळीये दुर्घटनेतील मृतांचे बळी वाढतेच, थोरातांकडून आकडा वाढण्याची भीती

News Desk

देशमुखांची चौकशी करणं राज्य सरकारनं हेतूपूर्वक टाळलं ?

News Desk