मुंबई। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधल्या नंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मी दिल्लीत गेलो होतो. नागपूरचं एक शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो. धर्मेंद्र प्रधान यांची भेट घ्यायची होती. त्यांच्या भेटीला उशिर होता म्हणून अमित शहा यांना फोन केला. तर त्यांनी १५ मिनिटं आहेत, भेटायला येऊ शकतो म्हणून सांगितलं. त्यामुळे त्यांची भेट घेतली. मी कोणत्याही कारणाने दिल्लीत गेलो तर पतंगबाजी होते. आज दिवसभर ही पतंगबाजी सुरू होती. त्यामुळे माझं मनोरंजन झालं, असं फडणवीस म्हणाले
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्ली वारीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतल्याचं स्पष्ट केल्या नंतर, हल्ली मी कोणत्याही कारणाने दिल्लीत गेलो तर त्याची पतंगबाजी होते. आज दिवसभर पतंगबाजी सुरू होती. ही पतंगबाजी पाहून माझं मनोरंजन झालं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
जरेंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर प्रतिक्रिया-
महाराष्ट्र राज्य को-ऑप बँक घोटाळा प्रकरणात ईडीने गुरुवारी(१जुलै) ला मोठी कारवाई केली. सातारा येथील जरेंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जागा, इमारत आणि इतर बांधकाम जप्त केलं आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असून या सहकारी साखर करखान्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संबंध असल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांच म्हणणं आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. याबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २२ ऑगस्ट २०१९ रोजी हा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा भा. दं. वी.च्या १२० बी, ४२०, ४६७ , ४६८, ४७१ कलमा नुसार दाखल करण्यात आला होता. त्याच प्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या १३ (१) (ब), १३ (१) (क) कलम ही लावण्यात आली होती. याच गुन्ह्याच्या आधारावर ईडीने आपला गुन्हा दाखल केला करून तपास सुरू केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फडणवीस म्हणाले की, जरंडेश्वर कारखान्याप्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे, ही चौकशी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाने होत आहे. उच्च न्यायालयाने थेट गुन्हा नोंदवण्यास सांगतिले होते. त्यातूनच पुढे ही चौकशी सुरु झाली आहे. यामागे कोणताही राजकीय हेतू नाही
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.