HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाबाबत हिंदुस्थानचा इटली, जर्मनी होऊ द्यायचा नसेल!

मुंबई। रविवारी संध्याकाळी लोकांनी टाळय़ा, थाळय़ा वाजवल्या. आता टाळय़ा, थाळय़ांचे जरा बाजूला ठेवा, बाहेर पडण्याचे टाळा. कोरोनाबाबत हिंदुस्थानचा इटली, जर्मनी होऊ द्यायचा नसेल व स्वतःचे किमती आयुष्य पणाला लावायचे नसेल, खरेच जाज्वल्य देशभक्ती असेल तर सगळय़ांनी ‘घरी’च थांबायला हवे. 1896 च्या प्लेग साथीत पुण्यात टिळक, आगरकरांपासून सगळय़ाच मातब्बरांनी स्वतःला ‘क्वारंटाइन’ केले व शहराबाहेरच्या तंबूत जाऊन राहिले होते. आता शहराबाहेर नाही, तर घरातच राहायचे आहे. राज्य सरकारने ‘लॉकडाऊन’ करून योग्य आणि आवश्यक पाऊल उचलले आहेच. जनतेनेही एका निश्चयाने, जिद्दीने त्याला साथ देत संयम दाखवायला हवा. तसे झाले तर मुख्यमंत्री म्हणाले तशी कोरोनाची वजाबाकी करण्यात महाराष्ट्र नक्कीच यशस्वी होईल. एक खरे की या कालावधीत रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल, तो होणारच आहे. परंतु सरकार प्रजेला उपाशी मारणार नाही याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही. सामनाच्या अग्रलेखात कोरोना विरोधात लढण्यासाठी लोकांनी घरात राहण्याचे आवाहन केले.

सामनाचा आजचा अग्रलेख

कोरोनाबाबत हिंदुस्थानचा इटली, जर्मनी होऊ द्यायचा नसेल व स्वतःचे किमती आयुष्य पणाला लावायचे नसेल तर सगळ्यांनी ‘घरी’च थांबायला हवे. 1896 च्या प्लेग साथीत पुण्यात टिळक, आगरकरांपासून सगळय़ाच मातब्बरांनी स्वतःला ‘क्वारंटाइन’ केले व शहराबाहेरच्या तंबूत जाऊन राहिले होते.आता शहराबाहेर नाही, तर घरातच राहायचे आहे. राज्य सरकारने ‘लॉकडाऊन’ करून योग्य आणि आवश्यक पाऊल उचलले आहेच. जनतेनेही एका निश्चयाने, जिद्दीने त्याला साथ देत संयम दाखवायला हवा. तसे झाले तर मुख्यमंत्री म्हणाले तशी कोरोनाची वजाबाकी करण्यात महाराष्ट्र नक्कीच यशस्वी होईल.

महाराष्ट्रासह देशभरात ‘जनता कर्फ्यू’ एक हजार टक्के यशस्वी झाला. लोक रविवारी घरीच थांबले, संध्याकाळी थाळय़ा वगैरे वाजवून अत्यावश्यक सेवा देणाऱयांचे कौतुक केले. हे सगळे ठीक असले तरी कोरोनाचा आपल्या देशाला खरा धोका आताच आहे. त्यादृष्टीने पुढील एक-दोन आठवडे अतिशय संवेदनशील आहेत. त्यामुळेच राज्य सरकारनेही रविवार मध्यरात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत 144 कलम म्हणजे जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी कोरोनाच्या वाढत्या धोक्याची जाणीव करून देत हा निर्णय जाहीर केला. थोडक्यात, पुढील 31 मार्चपर्यंत महाराष्ट्रातही ‘लॉकडाऊन’ परिस्थिती असेल. मेल, एक्सप्रेस तर बंदच असतील, पण एसटी, आंतरराज्यीय बससेवादेखील बंद राहतील. मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकलसेवाही रविवार मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यंत धावणार नाही. जीवनावश्यक सेवाच फक्त सुरू राहतील. हे सर्व करणे आवश्यकच होते. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले तसा कोरोनाबाबत महाराष्ट्र आता खऱया अर्थाने ‘डेंजर झोन’मध्ये आहे. आतापर्यंत बेरजेच्या संख्येने वाढणारी कोरोनाबाधित व संशयितांची संख्या पुढे गुणाकाराच्या पटीत वाढू शकते. ही भीती अनाठायी नाही. कारण रविवारीच महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 64 वरून 75 गेली आहे. हे आकडेसुद्धा वरवरचे आहेत. मुंबईत सहा तर पुण्यात आणखी चार रुग्ण वाढणे ही चिंता वाढवणारी बाब आहे. या कोरोनाबाधितांनी परदेशात प्रवास केला व त्यातून हे रुग्ण वाढले. आपण परदेशात प्रवास केलाय हे लपवून काय करणार? कष्टकऱयांनी कामावर जाणे, शेतकऱयांनी शेतावर जाणे व कामगारांनी फॅक्टऱयांत जाणे ही आतापर्यंत देशसेवा ठरत होती. आता कामगारांनी काही काळ घरी बसणे हीच देशसेवा ठरत आहे. इटलीने सर्व ‘फॅक्टऱया’ बंद केल्या. एका दिवसात 800 मृत्यू झाल्यानंतर इटली सरकारला ही कठोर पावले उचलावी लागली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. लोकांना आज स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘प्लेग’ महामारीची आठवण येत आहे. सवाशे वर्षांपूर्वी अशाच एका संसर्गजन्य रोगाने

हिंदुस्थानला वेठीस

धरले होते, तो रोग म्हणजे प्लेग. 1896 साली आलेल्या पुरामुळे मुंबईतल्या गोदामातले उंदीर मेले. त्यातून प्लेग हा रोग सर्वत्र पसरला. शेकडो जणांचा मृत्यू झाला, लाखो जण शहर सोडून निघू लागले. रेल्वे, जहाजांवर तपासणी केल्याशिवाय प्रवेश मिळत नव्हता, पण तरीही बेजबाबदारपणा व अस्वच्छतेमुळे फैलावणाऱया या रोगाने पुण्यात एंट्री केली. 19 डिसेंबर 1896 ला पुण्याच्या रास्ता पेठेत प्लेगचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर काही दिवसांतच पुण्यात या रोगाने महामारीचे रूप धारण केले. ‘रँड’ या अधिकाऱयाने सक्तीने लोकांना बाहेर काढून ‘क्वारंटाईन’ केले. रँडच्या काळात पुण्यात प्लेगसारख्या संसर्गजन्य रोगासाठी एक हॉस्पिटल स्थापन झाले. ते आजचे नायडू हॉस्पिटल आणि तेथेच आज कोरोनासंसर्गित रुग्णांवर उपचार होत आहेत. पुणेकरांनी तेव्हा प्लेग गांभीर्याने घेतला नाही, निदान कोरोना व्हायरस तरी गांभीर्याने घ्यावा. मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर, नाशिकसारख्या शहरांनी स्वतःला सांभाळले नाही, तर हा रोग अक्राळविक्राळ रूप धारण करेल. पुण्यात साधारणपणे रोज 95 हजारांवर लोक शहर बस वाहतूक सेवेने प्रवास करतात. हा आकडादेखील मोठाच आहे. त्यामुळे पीएमटीसारख्या बससेवादेखील बंद करणे गरजेचे आहे. एक दिवसाच्या ‘जनता कर्फ्यू’पुरता हा विषय नाही, तर पुढचे काही दिवस लोकांनी स्वयंस्फूर्तीने स्वतःला घरातच कोंडून घेतले पाहिजे. 130 कोटींच्या आपल्या देशात आज 50 हजारांमागे एक बेड उपलब्ध आहे. गेल्या दोन दिवसांत 40 टक्के कोरोना विषाणूबाधित संशयित वाढले आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेतले तरच सरकार जी पावले टाकत आहे त्यास यश मिळेल. इटलीमध्ये लोकांनी वेळीच ‘कोरोना’चे गांभीर्य ओळखले नाही. त्याविषयी खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी ऐकल्या नाहीत, उलट रस्त्यांवर येऊन नाचत होते. तेथील जनतेने शिस्त पाळली नाही, त्याचे परिणाम ते आज भोगत आहेत. रोमसारख्या शहराचे निर्मनुष्य वाळवंट बनले आहे. व्हेनिस, मिलानसारख्या शहरांचे

रूपांतर कब्रस्तानात

झाले आहे. लोकांना आपल्या आप्तांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही करता येत नाहीत. इटलीत कोरोना सहाव्या, सातव्या स्तरांवर पोहोचला आहे. जर्मनीही त्याच दिशेने जात आहे. कारण त्यांनी योग्य वेळी लॉकडाऊन, संपूर्ण शटडाऊनसारखे निर्णय घेतले नाहीत. हिंदुस्थानही तीच चूक करताना दिसत आहे. पंतप्रधान एरवी ‘झटका’ निर्णय घेऊन सगळय़ांना आश्चर्यचकित करून सोडतात. नोटाबंदी करताना लोकांना एक मिनिटही वेळ दिला नव्हता, मग इतक्या गंभीर महामारीप्रसंगी वेळ का काढला गेला? मुंबईच्या रेल्वेवर सगळय़ात आधी बंदी आणायला हवी होती, पण रेल्वे प्रशासन त्यास तयार नव्हते. येथेही जी चूक इटली, जर्मनीत झाली तीच चूक आपण केली. गर्दीचा संसर्गजन्य अड्डा हा रेल्वेच आहे. मुंबई, पुण्याच्या रेल्वे फलाटांवर सगळय़ात जास्त गर्दी असते. लोक महाराष्ट्राबाहेर आपापल्या गावी पळून जात आहेत. त्यापैकी अनेकांच्या हातांवर ‘क्वारंटाइन’चे शिक्के मारलेले आहेत. रेल्वे सेवा बंद झाली असती तर सुरुवातीला जे चार-पाच होते ते चौऱयाहत्तरपर्यंत गेले नसते. बेफिकिरी फक्त जनतेच्या पातळीवर नाही, तर प्रशासकीय पातळीवरसुद्धा आहे. टाळी एका हाताने वाजत नसल्याचा हा दाखला. रविवारी संध्याकाळी लोकांनी टाळय़ा, थाळय़ा वाजवल्या. आता टाळय़ा, थाळय़ांचे जरा बाजूला ठेवा, बाहेर पडण्याचे टाळा. कोरोनाबाबत हिंदुस्थानचा इटली, जर्मनी होऊ द्यायचा नसेल व स्वतःचे किमती आयुष्य पणाला लावायचे नसेल, खरेच जाज्वल्य देशभक्ती असेल तर सगळय़ांनी ‘घरी’च थांबायला हवे. 1896 च्या प्लेग साथीत पुण्यात टिळक, आगरकरांपासून सगळय़ाच मातब्बरांनी स्वतःला ‘क्वारंटाइन’ केले व शहराबाहेरच्या तंबूत जाऊन राहिले होते. आता शहराबाहेर नाही, तर घरातच राहायचे आहे. राज्य सरकारने ‘लॉकडाऊन’ करून योग्य आणि आवश्यक पाऊल उचलले आहेच. जनतेनेही एका निश्चयाने, जिद्दीने त्याला साथ देत संयम दाखवायला हवा. तसे झाले तर मुख्यमंत्री म्हणाले तशी कोरोनाची वजाबाकी करण्यात महाराष्ट्र नक्कीच यशस्वी होईल. एक खरे की या कालावधीत रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल, तो होणारच आहे. परंतु सरकार प्रजेला उपाशी मारणार नाही याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘तोपर्यंत कोणी माझ्या गळ्यात हार घालायचा नाही, फेटाही बांधू नये!’

News Desk

बीड जिल्ह्यातील १०७८ गावांमधील पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करा! – गुलाबराव पाटील

Aprna

कोरोनाचं संकट असतांना अशोकरावांचे आंदोलन, हे बरोबर आहे का? संभाजीराजेंचा सवाल

News Desk