HW News Marathi
महाराष्ट्र

बाबासाहेब पुरंदरेंचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात कराण्याची फाईल ५ तास पडून होती? पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई। आदित्य ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चार्ज द्यावा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. राज्यात उद्यापासून (२२ डिसेंबर) हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज (२१ डिसेंबर) राज्य सरकारकडून चहापान्याचा कार्यक्रम होता. परंतु विरोधकांनी चहापान्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला.

दरम्यान, “आरोग्यच्या कारणावरून राज्यावर अन्याय करू नका. गेल्या ४५ दिवसांपासून राज्यातल्या जनतेने मुख्यमंत्र्यांना पाहिलेच नाही. मुख्यमंत्र्यांना सामान्य माणसाला सहानुभूती ठीक आहे. परंतु, एका नेत्याला सहानुभूती चालत नाही आणि यामुळेच तो नेता होतो. सहानुभूतीच्या जीवावर राज्य चालत नाही. एक दिवस परदेशात जायचे असेल तरी मुख्यमंत्र्यांन चार्ज द्यावा लागतो. परंतु, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा कोणावर विश्वासच दिसत नाही. जर तुमचा कोणावर विश्वास नसेल तर

आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्री पदाचा चार्ज द्या, ” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

यासंदर्भात पाटलांनी सांगितले की, “बाबासाहेब पुरंदरे यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करावेत, यासाठी फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही हवी होती. परंतु, या फाईलवर मुख्यमंत्र्यांच्या सही सहीसाठी पाच तास पडून होती. बाबासाहेब पुरंदरेवर ही वेळ येत असेल तर इतरांच काय? त्यामुळ महाराष्ट्राला रामभरोसे ठेवता येणार नाही. “

मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारल्यावर ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली असून ते त्यांच्या सोयीने विधीमंडळ कामकाजात सहभागी होणार अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री अधिवेशन येणार का? असा प्रश्न विचारल्यावर अजित पवार म्हणाले, “हे आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? ” असा सवाल त्यांनी केला. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बोगस मतदान रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लिहिले निवडणूक आयोगाला पत्र

News Desk

“अमृताताई आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो”

News Desk

एकल वापर प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करणार, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही

Manasi Devkar