HW News Marathi
महाराष्ट्र

‘करुणा शर्मा यांनी मदत मागितल्यास ती देणार बीड भाजप’ – राजेंद्र म्हस्के

बीड। करुणा शर्मा आणि महाविकास आघाडीतील मंत्री असलेले धनंजय मुंडे हे प्रकरण गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर आहे. आता या प्रकरणावर बीड मधून भाजपची पहिली प्रतिक्रिया आली आहे. करुणा शर्मांच्या समर्थनात आता भाजप मैदानात उतरणार आहे. करुणा शर्मा यांच्यासोबत अन्याय झाला असून त्यांच्या वरील गुन्हे दाखल करणे हे चुकीचे झाले आहे. शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल टाकण्यात आली असून, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आता भाजप कडून होऊ लागलीय. दरम्यान याप्रकरणी भाजप शर्मा यांच्या पाठीशी आहे, असं जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सांगितलं आहे.

पंकजा मुंडे यांचं ट्विट

अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो.शासन,प्रशासन,न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये,wrong president should not be set!ही काळाची गरज आहे,परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची ! असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्या भावावर नाराजी व्यक्त केल्याचं पहायला मिळत आहे.

प्रकरण काय आहे?

परळी येथे येऊन धनंज मुंडे यांच्याविरोधातील पुरावे पत्रकार परिषदेत देणार असल्याचे करुणा शर्मा यांनी जाहीर केले होते. त्यानुसार, त्या दुपारी परळीमध्ये आल्या. त्यांनी सुरुवातीला वैद्यनाथ देवस्थानच्या पायरीचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलांच्या जमावाने त्यांना घेराव घातला. ‘धनंजय मुंडे यांची बदनामी का करत आहात,’ असा जाब विचारत या महिलांनी त्यांना अडवले. त्या वेळी महिलांबरोबर त्यांची शाब्दिक चकमक झाली. जमावाने त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्नही केला. तर, तुम्ही पैसे घेऊन मला विरोध करत आहात, असा आरोप करत करुणा शर्मा यांनी मारहाण केल्याची तक्रार विशाखा घाडगे व गुड्डी तांबोळी या दोन महिलांनी पोलिसांत दिली. त्यावरून, करुणा शर्मा यांच्यासह दोघांविरुद्ध परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हस्तक्षेप करत करुणा शर्मा यांना शहर पोलिस ठाण्यात नेले. याच काळात त्यांच्या गाडीमध्ये पिस्तुल सापडले आणि खळबळ उडाली. गाडीत सापडलेल्या पिस्तुल प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत. तर, हे पिस्तुल आपले नसून, अडचणीत आणण्यासाठी हे पिस्तूल गाडीत टाकले असल्याचे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे. दरम्यान, तोंडाला रुमाल बांधलेला एक जण गर्दीतून गाडीच्या मागील बाजूला काही तरी टाकत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याची चर्चा आहे. त्यामुळे, या प्रकरणातील गुंतागूंत वाढली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा वादप्रकरणी पालकमंत्र्यांचे आवाहन

News Desk

 #CoronaVirus : आजपासून सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासावर निर्बंध लागू

swarit

जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी माणूस हा बाळासाहेब ठाकरेंचा आजन्म ऋणी! – संजय राऊत

Aprna