HW News Marathi
देश / विदेश

‘मनसे’ची मतं आमच्याशी जुळली तर नक्कीच…! फडणवीसांनी दिले नवे संकेत

मुंबई । महाराष्ट्राचे राजकारण हा नेहमीच देशासाठी चर्चेचा विषय असतो. राज्यात अनेक आगामी राजकीय शक्यता आणि अंदाजांबाबत चर्चा होत असते. गेल्या काही महिन्यांत राज्यात अशीच सातत्याने होणारी एक चर्चा म्हणजे “भाजप आणि मनसे एकत्र येणार का?” दरम्यान, आता खुद्द विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच संकेत दिले आहेत. “मनसेने हिंदुत्व थोड्या प्रमाणात स्वीकारलं आहे. आणखी काही बाबतीत मनसेची मतं आमच्याशी जुळली तर आम्ही नक्कीच वेगळा विचार करु”, असे देवेंद्र फडणवीस म्हटले आहे.

लोकसत्ता या वृत्तपत्राच्या एका विशेष कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आज (४ जून) बोलत होते. देवेंद्र फडणवीस यावेळी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाण्याबाबत म्हणाले की, “मनसेने हिंदुत्व थोड्या प्रमाणात स्वीकारलं आहे किंवा ते स्वीकारत आहेत. आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहोत. पण आमचा अजेंडा हा व्यापक आहे. क्षेत्रीय अस्मिता आमच्याकडे देखील आहे. पण त्यासोबतच राष्ट्रीय अस्मिता देखील आम्हाला महत्त्वाची आहे.”

पण ही आहे अडचण !

आपल्या मुद्दा स्पष्ट करताना पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आम्ही मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही. पण त्याकरता दुसऱ्यावर अन्याय करुन मराठी माणसावर अन्याय होऊ द्यायचा नाही हे आम्हाला योग्य वाटत नाही. त्यामुळे याबाबत आमची आणि मनसेची मतं सध्यातरी वेगवेगळी आहेत. ती मतं जुळली तर वेगळा विचार करता येईल. आज तरी ती मतं जुळत नाहीत. त्यामुळे सध्या तरी युतीचा कोणताही प्रश्न निर्माण होत नाही”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे आमच्यासाठी सध्या पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणे अशक्य!’

News Desk

राजगृह म्हणजे आमची अस्मिता, ‘त्या’ माथेफिरूना अटक करून कठोर कारवाई करा – धनंजय मुंडेंची गृहमंत्री अनिल देशमुखांना मागणी

News Desk

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लांबणीवर

News Desk