HW News Marathi
महाराष्ट्र

“…नाही तर सामुदायिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या”, MPSC च्या विद्यार्थ्यांचा निर्वाणीचा इशारा

मुंबई। MPSC ची परिक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर एमपीएससीचे विद्यार्थी आता एकवटले आहेत. २०१९ला आम्ही एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालो आहोत. ४१३ पदांसाठी ही परीक्षा झाली होती. उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार आदी पदांसाठी ही परीक्षा होती. या परीक्षेत उत्तीर्ण होऊन आता २ वर्ष होत आलेत आणि सर्वोच्च न्यायालयानेही मराठा आरक्षणावर निकाल दिला आहे. त्यालाही २ महिने झाले तरीही आम्हाला नियुक्ती देण्यात आली नाही. आम्हाला नियुक्ती देण्यासाठी अधिक विलंब लावू नये.

आम्हाला तात्काळ नोकरीत सामावून घ्यावे, नाही तर आम्हाला सामुदायिक आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही अश्या आशयाच पत्र विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलं.एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही दीड वर्षात नोकरी न मिळाल्याने नैराश्य आलेल्या स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. त्यामुळे एमपीएससीचे विद्यार्थी अस्वस्थ आणि संतप्त झाले आहेत. आम्हाला लवकर नियुक्त्या द्या, नाही तर सामुदायिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून ही मागणी केली आहे.

MPSC च्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गोपीचंद पडळकर, राम सातपुते यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. पुण्यातील आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. एकूणच एमपीएससीच्या कार्यपद्धतीचं नव्याने अवलोकन करणं आवश्यक आहे. अनेक जागा रिक्त आहेत. परीक्षा उशिरा होतात. अनेक तरुण यामुळे भरडले जात आहे. एमपीएससीला स्वातंत्र्य हवंच पण स्वैराचार नको, अशा कडक शब्दात फडणवीस यांनी एमपीएससीवरही तोफ डागली आहे. एमपीएससी संदर्भात राज्य सरकारनं दुर्लक्ष करु नये. स्वायत्त संस्थेला पूर्ण स्वातंत्र्याने काम करु द्यायला हवं. परीक्षा पास झाल्यानंतर २-२ वर्षे मुलाखती होत नाहीत. पोस्टिंग मिळत नाही म्हणून झालेल्या आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे, अस देखील फडणवीस म्हणाले. तर दुसरीकडे या युवकाच्या आत्महत्येला राज्य सरकारचा बेफिकिरपणा जबाबदार आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी मंत्री संजय राठोड पुन्हा आले चर्चेत..नेमकं काय झालं ?

News Desk

दाभोलकर हत्येप्रकरणी ‘सनातन’शी संबंधित पाच जणांवर आरोप निश्चित करण्याचे न्यायालयाचे आदेश!

News Desk

नाणार प्रकल्पग्रस्तांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट

News Desk