HW News Marathi
महाराष्ट्र

‘बेबी पेंग्विन’ ने त्रास होत असेल तर ‘वाघ’ म्हणा म्हणजे घराबाहेर पडतील,भाजपचा आदित्यंना टोला

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या समित ठक्कर या व्यक्तिच्या विरुद्ध नागपुरात गुन्हा दाखल झाला आहे. समित ठक्कर याने ट्विटवर एक फोटो शेअर केला आणि त्या फोटोला संदर्भ देत आदित्य ठाकरे यांचा उल्लेख ‘महाराष्ट्राचे मोहम्मद अझम शाह आणि बेबी पेंग्विन’ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘ माॅडर्न युगातील औरंगजेब’ असा केला होता.

त्यानतंर आता भाजप नेते आदित्य ठाकरेंवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी या सर्व प्रकणावर भाष्य करताना असे ट्विट केले आहे की , बेबी पेंग्विन म्हणून कुणाला त्रास होत असेल तर कशाला उगाच कुणाच्या भावना दुखवता?कृपया यापुढे त्यांचा उल्लेख वाघ असा करावा (मग तरी घराबाहेर पडतील)..’

अतुल भातखळकर यांनी असे ट्विट करत पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे. मुख्यमंत्री आणि सरकारचे इतर मंत्री घराबाहेर पडत नाहीत अशी टिका वारंवार केली जाते. त्यासंदर्भाने त्यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांसाठी रद्द

Aprna

वाढीव वीज बिलाच्या मुद्यावर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार

News Desk

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचं संकट; पुण्यासह ६ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

News Desk