HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री आणि आदित्यंविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या व्यक्तिला निलेश राणेंचा पाठिंबा !

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या समित ठक्कर या व्यक्तिच्या विरुद्ध नागपुरात गुन्हा दाखल झाला आहे. समित ठक्कर याने ट्विटवर एक फोटो शेअर केला आणि त्या फोटोला संदर्भ देत आदित्य ठाकरे यांचा उल्लेख ‘महाराष्ट्राचे मोहम्मद अझम शाह आणि बेबी पेंग्विन’ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘ माॅडर्न युगातील औरंगजेब’ असा केला होता.

दरम्यान, या समित ठक्कर याच्या या ट्विटला भाजप नेते निलेश राणे यांनी पाठिंबा दिला आहे. त्यानी ट्विट करत असे लिहिले आहे की, आम्ही तुझ्या सोबत आहोत. ते ( शिवसेना) कोणासोबत असे वागू शकत नाही, असे ट्विट करत समित याने मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांच्याविरूद्ध केलेल्या आक्षेपार्ह टीकेला पाठिंबा दिला आहे.

 

वी पी रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जुलैला ठक्कर नावाच्या व्यक्तिने ट्विटवर एक फोटो शेअर केला आणि त्या फोटोला संदर्भ देत आदित्य ठाकरे यांचा उल्लेख ‘महाराष्ट्राचे मोहम्मद अझम शाह आणि बेबी पेंग्विन’ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘ माॅडर्न युगातील औरंगजेब’ असा केला. तसेचं तक्रारीमध्ये सांगितल्याप्रणाणे या व्यक्तीने राऊत यांच्याविरोधातसुद्धा ट्विट केले आहे.

युवासेनेते कायदेशीर प्रमुख धर्मेंद्र मिश्रा यांनी ही तक्रार दाखल केली आहे. यात त्यांनी असे म्हटले आहे की, मी ठक्कर याचे ट्विटर अकाऊंट पहिले तर मला असे निदर्शनास आले की याआधी देखील त्याने अशी आक्षेपार्ह टीका केली होती. महत्वाची बाब म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी त्याला फॉलो करत आहेत. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे की अशा लोकांना देशाचे पंतप्रधान फॉलो करत आहेत. वी पी रोड पोलिसांनी IPC अंतर्गत सेक्शन २९२, ५०० आणि सेक्शन ६७ गुन्हा दाखल केला आहे आणि ठक्कर वानर व्यक्तींला नोटीस पाठवली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

३-४ महिने भूमिगत होतात, आणि एखादे व्याख्यान देऊन पुन्हा गायब; शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला

Aprna

माझी पत्नी आरएसएसमध्ये कधी गेली ?

News Desk

मुंबई पोलिसांचे ‘थोबाड काळे झाले’ अशाप्रकारची भाषा देवेंद्र फडणवीस हे कसे वापरू शकतात?-अनिल देशमुख

News Desk