HW News Marathi
महाराष्ट्र

अध्यक्ष झाल्यावर राहुल गांधींनी सरकारमधुन बाहेर पडण्यास सांगितले तर बाहेर पडू- विजय वडेट्टीवर

नागपूर | कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून सोनिया गांधी यांनी राजीनामा दिला तर त्यांच्या जागी राहुल गांधी यांनी पदभार घ्यावा असे म्हटले जात आहे.सोनिया गांधी यांनी संकटात काँग्रेसला सांभाळले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांना पसंती आहे, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. गांधी परिवारातील व्यक्ती राष्ट्रीय अध्यक्ष व्हावा असे मत आहे.

दरम्यान, “अध्यक्ष झाल्यावर राहुल गांधींनी सरकारमधून बाहेर पडण्यास सांगितल्यास आम्ही सत्ता सोडू. काँग्रेसजन म्हणून आम्ही हायकमांडच्या निर्णयासोबत आहोत”, असंही यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले. काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन वादावादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी असलेल्या सोनिया गांधी यांनी पद स्वीकारुन वर्ष होणार आहे. काँग्रेस कार्यकारिणी( CWC) बैठक आज होत आहे. या बैठकीत सोनिया गांधी राजीनामा देण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन गट पडले आहेत. एका गटाची मागणी ही सोनिया गांधी अध्यक्षपदी राहाव्या, तर दुसऱ्या गटाने राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी केली आहे. काँग्रेसचे अध्यक्षपद गांधी घराण्याकडेच रहावे यासाठी काँग्रेसच्या कार्यकारिणीचे सदस्य आग्रही आहेत.

तसेच, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत पत्र पाठवले आहे. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा असे या पत्रात म्हटले आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांचा समावेश असल्याचे बोललं जातं आहे.

“काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मी मनापासून समर्थन करतो. मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी गांधी घराण्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणे हे लज्जास्पद आहे. त्यांनी त्यांच्या या कृत्याबद्दल तातडीने माफी मागितली पाहिजे. अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाहीत”, असे ट्विट राज्याचे दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्तेसाठी शिवसेनेने सगळी तत्वे गुंडाळून मातोश्रीच्या एका कोपऱ्यात ठेवली !

News Desk

हॉकी संघाचा सेमीफायनलमध्ये पराभव, एथलेटिक्स खेळातही अपयश!

News Desk

धक्कादायक ! बारामतीत एकाच कुटुंबातील ५ जण कोरोना पॉझिटिव्ह

News Desk