HW News Marathi
देश / विदेश

संजय राऊत राष्ट्रपती झाले तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट चालेल !

मुंबई कॅामेडियन कुणाल कामराच्या ’शट अप कुणाल’ या शोसाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत मुलाखतीचे चित्रिकरण नुकतेच झाले आहे.सतत चर्चेत असणाऱ्या कुणाल कामराने आता महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट लावण्याच्या वादात उडी घेतली आहे. ‘शिवसेना नेते संजय राऊत राष्ट्रपती होतील, तेव्हा मला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट चालणार आहे’ अशा शब्दांमध्ये ट्विट करत त्याने भाजपचा आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी आग्रही असणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरत आहे. नेत्यां पासुन ते अभिनेत्यांपर्यंत अनेकांना ही मागणी केली. मात्र याचसंदर्भात दिल्लीतील तीन व्यक्तींनी सुप्रिम कोर्टात केलेली याचिका कोर्टाने फेटाळली आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं अनेकांचं स्वप्न भंगल.त्याच पार्श्वभूमिवर कुणाल कामराने संजय राऊत राष्ट्रपती झाले तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट चालेल असे चिमटे विरोधकांवर काढले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनमोहन सिंग रुग्णालयात दाखल, त्यावर नरेंद्र मोदींनी केलं ट्वीट

News Desk

काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा खतरनाक!

News Desk

#Article370Abolished : सरकारचा ‘हा’ निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्याविरोधात !

News Desk