HW News Marathi
महाराष्ट्र

“जर ती वेळ आली तर विचार करू”,मनसे सोबतच्या युतीवर फडणवीसांचं महत्त्वपूर्ण विधान..!

मुंबई। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्यासंदर्भात मोठं भाष्य केलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांना मनसेला सोबत घेणार का असा प्रश्न विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज ठाकरेंशी चांगले संबंध आहेत. त्यांच्या पूर्वी भेटी झाल्या आहेत. ज्यांची आमची भूमिका पटेल त्यांच्या सोबत जाण्यासाठी हरकत नाही. आम्ही अनेक पक्ष सोबत घेतले आहेत जर ती वेळ आली तर त्यांचा विचार करू, असं विरोधी पक्ष नेते फडणवीस म्हणाले.

मिश्कीलपणे अजित पवारांचा चिमटा

जुलै मध्ये वाढदिवस असणारे मुख्यमंत्री होतात का या प्रश्नावर त्यांनी मिश्किलपणे सांगत अजित पवारांचा चिमटा काढला. ते म्हणाले की, तुम्ही याविषयी अजित पवारांना विचारलंत तर त्यांना जास्त आनंद होईल. कारण त्यांचाही जुलैचा वाढदिवस आहे. पण त्यांची संधी बऱ्याचदा हुकलीये पण आता त्याबद्दल काय सांगायचं, असं ते म्हणाले. राज्यासमोर अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदापेक्षाही महत्त्वाचे प्रश्न सध्या आहेत, असं म्हणत त्यांनी उत्तर देण्यासाठी टाळाटाळ केली.

तुमचं आणि अजित पवार यांचं नातं कसं आहे?

असा प्रश्न केला असता फडणवीस म्हणाले की, प्रश्न नात्याचा नाही. एका वृत्तपत्राने आम्हाला दोघांना एकमेकांविषयीचा लेख मागितला. आता एवढी वर्षे अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. त्यामुळे त्यांचं काही ना काही कर्तृत्व तर नक्कीच आहे. वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलं आहे. त्यांची कामाची एक वेगळी शैली आहे. त्यामुळे त्यांच्या काही गोष्टींबद्दल आमचं दुमत असेल, काही गोष्टींबद्दल विरोध असेल. पण त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान मान्य करणं ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. त्यांनीही माझ्या कार्याविषयी त्यांना जे वाटतं त्याबद्दल लेख लिहिला आहे. त्यापलीकडे याकडे पाहण्याची गरज नाही, असून देखील राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

गेली 25 वर्षे आम्ही एकमेकांचे मित्र

फडणवीसांनी सांगितलं की, मी मुख्यमंत्र्यांना कधीही फोन करुन त्यांच्याशी बोलू शकतो. मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या का अशी विचारणा त्यांना करण्यात आली. त्यावेळी फडणवीस म्हणाले, हो, मी उद्धवजींना फोन करुन शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले, एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही राजकीय विरोधक आहोत आणि ते आत्ता आहोत. गेली 25 वर्षे आम्ही एकमेकांचे मित्र राहिलो आहोत. आता त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला. त्यामुळे आम्ही एकमेकांसमोर आहोत. वैयक्तिकरित्या अशी परिस्थिती नाही की, मला त्यांना शुभेच्छा देता येत नाहीत. मी कधीही फोन उचलून त्यांच्याशी बोलू शकतो.

राज ठाकरेंचे युतीवर विधान

राज ठाकरेंनी परप्रांतियांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली तर आम्ही युतीबाबत विचार करु असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यावर राज ठाकरेंनी म्हटलं, “भूमिका स्पष्ट काय करायच्या, माझ्या भूमिका स्पष्ट आहेत. मी आतापर्यंत ज्या भूमिका मांडल्या आहेत त्या अगदी स्पष्ट आहेत. महाराष्ट्र हिताच्या भूमिका आहेत. त्यासोबतच देशहिताच्या सुद्धा भूमिका मांडल्या आहेत. प्रत्येक राज्याने आपआपली भूमिका कशी निभावली पाहिजे आणि काय काय केले पाहिजे. तुम्ही आमच्यावर आक्रमक केले नाही पाहिजे आणि आम्ही तुमच्यावर आक्रमण करत नाहीयेत”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाच्या फाईव्ह ट्रिलीयन डॉलरमध्ये महाराष्ट्राचा वाटा वन ट्रिलीयन डॉलरचा- मुख्यमंत्री

News Desk

लोकशाही पूर्णपणे नष्ट केली…

swarit

पतसंस्था मधील ठेवींना विमा संरक्षण देण्याबाबत प्रयत्न करु! – अजित पवार

Aprna