HW News Marathi
महाराष्ट्र

‘अजित पवारांनी भाषेबद्दल बोलणं म्हणजे राज कुंद्रांनी कुठला पिक्चर बघावा हे सांगण्यासारखं’

सिंधुदुर्ग ऑ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या खालच्या भाषेतील टीकेवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर आता भाजप आमदार आणि नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांनी अजित पवारांवर जहरी टीका केली. “कुठली भाषा वापरावी हे अजितदादांनी सांगावं हे म्हणजे राज कुंद्रांनी कुठला चित्रपट बघावा असं सांगण्यासारखं आहे. म्हणून भाषेबद्दल अजितदादांनी बोलू नये”, अशी टीका नितेश राणेंनी केली.

नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर एकेरी वार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चिपळूण दौऱ्यात अधिकाऱ्यांना झापताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका केली. मी चिपळूणमधली सगळी पाहणी करुन झाली तरी एकही अधिकारी मला येऊन आणखी भेटला नाही, हे काही बरोबर नाही, हे मी खपवून घेणार नाही, अशी तंबी राणेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यावर अधिकारी सीएमसाहेबांना निरोप देण्यासाठी गेले आहेत, असं समोरील अधिकाऱ्याने सांगताच, सीएम गेला उडत… मला कुणाची नावं सांगू नका, असा वार राणेंनी केला होता.

नितेश राणेंचा अजित पवारांवर वार

“कुठली भाषा वापरावी हे अजितदादांनी सांगावं हे म्हणजे राज कुंद्रांनी कुठला चित्रपट बघावा असं सांगण्यासारखं आहे. म्हणून भाषेबद्दल अजितदादांनी बोलू नये”, असा जहरी वार नितेश राणेंनी अजितदादांवर केला. ते सिंधुदुर्गात बोलत होते.

अजित पवारांचं नारायण राणेंना प्रत्युत्तर

हे लोक दौरा अधिकार्‍यांना पाहण्यासाठी करतात का? मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही, कुणीही वापरली नव्हती. यशवंतराव चव्हाणांपासून, शरद पवारांपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. मात्र अशी भाषा कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी वापरली नाही, असा हल्लाबोल अजित पवारांनी केला.

रोहितदादांनी पवारसाहेबांचं ऐकावं

सातत्याने पवार कुटुंबात विसंगती दिसते. अवेळी बोलणं, जास्त बोलणं हे कधीच पवार कुटुंबीय करत नाही. पार्थ पवार ,सुप्रिया सुळे अस बोलताना कधी दिसले नाहीत. रोहीत पवारांनी आपल्या आजोबांकडून योग्य गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्यांचं ऐकलं पाहिजे. नातूच आजोबांचा विचार पाळत नसेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का पाळावे असा प्रश्न सगळ्यांच्या समोर येतो. म्हणून रोहीतजींनी थोडं शिकून मगच पावल टाकावीत असा माझा मैत्रीचा सल्ला आहे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही वापरली नव्हती – अजित पवार

“काही नेतेमंडळी पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. प्रत्येकाला हा दौरा करण्याचा अधिकार आहे. आम्हीही विरोधात असताना दौरे केले. पण त्यावेळी जिल्हाधिकारी कुठे आहे, तहसीलदार कुठे आहे, प्रांत कुठे आहे, याची विचारणा करत बसलो नाही. मात्र काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात हा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही वापरली नव्हती. आणि ही महाराष्ट्राची संस्कृतीही नाही”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

ते लोक दौरा अधिकार्‍यांना पाहण्यासाठी करतात का? मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही, कुणीही वापरली नव्हती. यशवंतराव चव्हाणांपासून, शरद पवारांपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. मात्र अशी भाषा कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी वापरली नाही, असा हल्लाबोल अजित पवारांनी केला आहे.

‘सीएम वगैरे गेला उडत.. इथे तुम्ही का नाही ते सांगा’ – नारायण राणे

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे (२६ जुलै) चिपळूण मध्ये पूर्वपरिस्थितीचा आढावा घेत होते. चिपळूणच्या दौऱ्या दरम्यान अधिकारी उपस्थित नसल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. व्यापाऱ्यांनी जेव्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोर आल्या व्यथा मांडल्या त्यानंतर नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून झापलं. यावेळी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत असताना त्यांचा तोल ढळला ‘सीएम वगैरे गेला उडत.. इथे तुम्ही का नाही ते सांगा’, फोनवर असं म्हटलं आहे.

राणे का भडकले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील काल(२५ जुलै) चिपळुमनधल्या पुराचा आढावा घेत होते. त्यावेळी, ‘सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत अधिकारी सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. मग इथे कोण आहे? इथे तुमचा एक तरी अधिकारी उपस्थित आहे का? आत्तापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं. आता जागेवर बसू देणार नाही. मला कुणीही सीईओ वगैरे भेटलेला नाही, मी बाजारपेठेतच उभा आहे, कुठे आहेत सीईओ दाखवा’ असं म्हणत नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना झापलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ खडसेंच्या घरात ‘कमळा’वर ‘घड्याळ’, चर्चा तर होणारच!

News Desk

पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांना बदलले म्हणजे ते गुन्हेगार नाहीत! सेनेनं भाजपला सुनावलं

News Desk

राज्यातील सत्तांतरावरील आजची सुनावणी संपली; उद्या होणार पुढील युक्तीवाद

Aprna