HW News Marathi
महाराष्ट्र

“पक्षाने संधी दिली तर त्या संधीचे सोने करेन”, विधान परिषदेसंदर्भात पंकजा मुंडेंचे सूचक विधान

मुंबई | “मी विधान परिषदेसाठी दावा केलेलना नाही. पण, पक्षाने संधी दिली तर त्या संधीचे सोने करेन,” असे सूचक विधान भाजप नेते पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. पंकजा मुंडेंनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज (३ जून) आठवा स्मृतिदिना निमिताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाआधी माध्यमाशी बोलताना म्हणाले. राज्यात विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणुका होणार आहे. यात भाजपकडून पंकजा मुंडेंचे नाव राजकीय वर्तुळा चर्चेत आले आहे. 

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून  गोपीनाथ मुंडेंचा स्मृतिदिन गोपीनाथ गडावर करता आला नव्हता. परंतु, गोपीनाथ मुंडेंचा आठव्या स्मृतिदिन मोठ्या संख्येने गोपीनाथ मुंडेंचे समर्थक येणार असून यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे या कार्यक्रमात काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मध्य प्रदेशचे शिवराजसिंह चौहान हे गोपीनाथ गडावर येणार आहे.

पक्षाने संधी दिली तर त्या संधीचे सोने करेन

दरम्यान, विधानपरिषदेसाठी निवडणुका होणार आहे. विधान परिषदेसाठी पुन्हा एकदा पंकजा मुंडेंचे नाव चर्चेत आले आहे. भाजपकडून पंकजा मुंडेंना विधान परिषदे पाठवणार की नाही हे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेवर तुम्हाला पाठवणार असल्याच्या अशा चर्चा सुरू आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या “मी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार नाही. मी अशा कोणत्या संधीची अपेक्षाही करत नाही. किंवा कोणत्या संधीसाठी मी विधान परिषदेसाठी दावा केलेला तुम्हाला कुठे दिसलेला नाही. माझा तो स्वभाव देखील नाही. संधी मिळावी म्हणून राजकारणात वाट पाहणाऱ्यांमध्ये निश्चित माझा नंबर नाही. पक्षाने संधी मिळली तर त्या संधीचे सोने करून दाखविते. हे माझे काम आहे. हे माझे संस्कार आहे. साहेबांनी देखील जे पद भूषविले. त्यासाठी ते पद मोठे केले. त्यामुळे चिंदीचे सोने करावे, हे माझ्यामध्ये संस्कार आहेत.”  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक दुसऱ्या फेरीतही आघाडीवर!

News Desk

तरुणाची हत्या करणारे ते अखेर पोलिस निलंबित

News Desk

“…त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही” जयंत पाटलांचा टोला

Aprna