HW News Marathi
महाराष्ट्र

तरुणाची हत्या करणारे ते अखेर पोलिस निलंबित

आरोपी युवराज कामटे

सांगलीः पोलिस कोठडीत अनिकेत कोथळे या तरुणाची हत्या त्याच्या मृतदेह जाळून टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी सहा पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलाची प्रतिमा डागाळली आहे. दरम्यान, या प्रकरणाची सीआडी चौकशी होण्याची शक्यता आहे.

चोरीच्या गुह्यात अटक करण्यात आलेल्या अनिकेत कोथळे याचा पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर करून केलेल्या जबर मारहाणीत मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, पोलीस हवालदार अरुण टोणे, राहुल शिंगटे, वाहनचालक सूरज मुल्ला आणि झाकीर पट्टेवाला या पाच जणांना आधीच १३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, उपनिरीक्षक कामटे आणि त्याच्या टोळीने अनिकेत कोथळेचा सुपारी घेऊन खून केल्याचा पुनरूच्चार करीत अनिकेत कामाला असलेल्या लकी बॅग दुकानाचा मालक निलेश खत्री, गिरीश लोहाना आणि संबंधित ठाणे अंमलदारासह त्यावेळी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करावी, अशी मागणी कोथळेंच्या नातेवाईकांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसेचं पुण्यानंतर ‘मिशन नाशिक’, राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार

News Desk

“24 तासातले दोन तास मला उचक्या लागतात”, नाव न घेता धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला

News Desk

भाजपच्या घंटानाद आंदोलनाआधी व्यथा आमच्यापर्यंत पोहोचली – संजय राऊत

News Desk