HW News Marathi
महाराष्ट्र

‘तर मास्तराच्या मुलाने हजार बाराशे कोटींची संपत्ती जमवली त्यांची चौकशी का होत नाही’-एकनाथ खडसे

जळगाव। राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. ज्यांचे वडील मास्तर होते. त्यांनी हजार बाराशे कोटींची संपत्ती जमवली. त्यांची चौकशी का होत नाही?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे खडसे आणि महाजन यांच्यात पुन्हा वाद रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर ईडीने कारवाई केल्याच्या चर्चेला उधाण आले होते. दरम्यान आज एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे एका कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना खडसे यांनी आता ईडीचा काहीही संबंध राहिला नसल्याचे म्हटले आहे. याबाबत न्यायालयात खटला दाखल केला असल्याचे त्यांनी सांगितलं. तसेच यावेळी आपल्याबद्दल अपप्रचार करणाऱ्या विरोधकांना खडसे यांनी धारेवर धरले असून गिरीश महाजन यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे.

भाजपच्या 11 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला

दरम्यान,खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचा गड असलेल्या जळगावात भाजपला मोठे धक्के बसत आहेत. 24 सप्टेंबर रोजी बोदवडमधील 11 नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या 11 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. महत्वाची बाब म्हणजे हे नगरसेवक एकनाथ खडसे समर्थक होते. त्यामुळे हा धक्का नेमका कुणाला? अशी चर्चा आता जळगावच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळतेय.

उद्धव साहेबांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून

भाजपच्या बोदवडच्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि त्यांच्यासोबत 11 नगरसेवक यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवत भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केलाय. पूर्वी मुक्ताईनगरचे 6 नगरसेवक शिवसेनेते दाखल झाले होते. मुक्ताईनगरचे गटनेतेही शिवसेनेत दाखल झाले आहेत. याचाच अर्थ तिथल्या आमदारांनी केलेली कामं आणि जनतेचा मिळवलेला विश्वास आणि उद्धव साहेबांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलाय. येणाऱ्या काळात मुक्ताईनगर जिल्हा परिषदेमध्येही अशीच स्थिती राहील, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय.

खडसे यांच्या नातेवाईकांनी 3.75 कोटी रुपयांना जमीन खरेदी केली

हा खटला 28 एप्रिल 2016 रोजी हवेली तालुक्यातील भोसरी गावात जमीन खरेदी करण्याशी संबंधित आहे. खडसे यांच्या नातेवाईकांनी 3.75 कोटी रुपयांना जमीन खरेदी केली. मात्र, प्रचलित बाजार दराच्या नुसार या जमिनिची किंमत 31 कोटी रुपयांच्या घरात आहे.ईडीचा खटला महाराष्ट्र भ्रष्टाचारविरोधी ब्युरोने (एसीबी) 2017 मध्ये खडसे यांच्या विरोधात केलेल्या पहिल्या माहिती अहवालावर आधारित आहे. एसीबीने नंतर हे प्रकरण बंद केले, परंतु ईडीने जमीन व्यवहारातील कथित आर्थिक अनियमिततेची चौकशी सुरू ठेवली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरातच्या पटेलचा शिवसेनेला ‘हार्दिक’ पाठिंबा

News Desk

कंगना राणावतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय सुरक्षा

News Desk

HW Exclusive | “आमच्या मुलीला ‘हा’ स्ट्रेस होता”, पूजा चव्हाणच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया

News Desk