HW News Marathi
Covid-19

‘महाराष्ट्रात लॉकडाऊन केलं तर सहकार्य करा’,मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फोन !

मुंबई | महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढतेय.या पार्श्वभूमिवर लॅाकडाऊनची अंमलबजावणी होण्याची शक्यता वाढली आहे.महाराष्ट्रात केव्हाही संपुर्ण लॅाकडाऊन घोषित केला जाऊ शकतो.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांसंबंधा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून बातचीत केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना फोन करत राज्य सरकारने जर लॅाकडाऊनचा निर्णय घेतला तर त्यांना मनसेने सहकार्य कराव असं म्हटलं आहे.यासंबंधी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना म्हणाले की , राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री मा.श्री. उद्धव ठाकरे ह्यांनी राजसाहेबांना फोनवरील संवादात केलं.

त्यामुळे आज जी कॅबिनेटची बैठक होत आहे त्यानतंर महाराष्ट्रात लाॅकाडऊन घोषित केले जाण्याची दाट शक्यता आहे.हा लॅाकडाऊन मर्यादित कालावधीसाठी केला जाऊ शकतो अशी माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तोबा गर्दी, हजारोंच्या जमावाकडून लॉकडाऊनच्या नियमांची ऐशीतैशी

News Desk

आईच्या निधनानंतर ३ दिवसातच राजेश टोपे पुन्हा राज्यासाठी कोरोना विरुद्धच्या लढाईत उतरले

News Desk

कोरोना लढाईत योगदान देणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनासाठी करवसुलीची अट शिथील

News Desk