मुंबई | तौक्ते चक्रीवादळाने गुजरात महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोरदार तडाखा दिला. या वादळामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे ,अनेक गावांना फटका बसला आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत,तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत.हे चक्रीवादळ गुजरात आणि दीव किनारपट्टीला जाऊन धडकलं होतं. त्यामुळे प्रचंड नुकसान झालं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या पाहणी दौऱ्यावर राष्ट्रवादीने टिका केली आहे.महाराष्ट्रातही तोक्ते वादळ आले मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधान भेदभाव का करत आहेत असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तोक्ते वादळाने नुकसान झालेल्या दीव-दमण आणि गुजरातचा हवाई दौरा करणार आहेत. महाराष्ट्रात तोक्ते वादळ येऊन नुकसान करुन गेले आहे मग महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत. महाराष्ट्राबद्दल असलेल्या या भेदभावाबद्दल नवाब मलिक यांनी ट्वीट करत सवाल उपस्थित केला आहे.
Today PM Modi ji is taking an ariel survey of #CycloneTauktae affected areas of Daman, Diu and Gujarat.
Why not the same of the areas affected in #Maharashtra ?
Is this not clear cut discrimination ?— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) May 19, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.