HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर सोनिया गांधी आणि शरद पवारांनी त्यांच्या हाताखाली काम करावं!

बुलढाणा | राज्यात मराठा आरक्षण हा मुद्दा गाजत आहे. यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने एक नवा मुद्दा मांडला आहे. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी असं म्हटलं आहे की, जर उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी त्यांच्या हाताखाली काम कराव.

उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर आनंदच

उद्धव ठाकरे यांच्या रुपाने मराठी माणूस पंतप्रधान झाला तर अभिमानच वाटेल. मात्र, त्यासाठी संख्याबळ असावं लागतं, असा उपरोधिक टोला भाजप नेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेला लगावला. तसेच उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी उपपंतप्रधान म्हणून त्यांच्या हाताखाली काम करावं, अशी खोचक टिप्पणीही प्रविण दरेकर यांनी केली आहे

ते आज (२९ मे) बुलढाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख व माध्यम सल्लागार हर्षल प्रधान यांनी लिहलेल्या एका लेखासंदर्भात भाष्य केले. या लेखात हर्षल पाटील यांनी उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान व्हावे, अशी सर्वसामान्यांची इच्छा असल्याचे म्हटले होते. त्यावर प्रविण दरेकर यांनी खोचक भाष्य शिवसेनेला लक्ष्य केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“बाकी सगळं स्मरणात येतं मग आमदारांच्या यादीचं विस्मरण होतं?”, राऊतांचा राज्यपालांना चिमटा

News Desk

Belgaum Election | भाजपच्या मंगला अंगडी विजयी, काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांचा २९०३ मतांनी पराभव

News Desk

पर्यावरण पूरक गणेश मुर्ती, सांगली जिल्ह्यातला आदर्श उपक्रम

News Desk