HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात व्यापारी राजवट खपवून घेतली जाणार नाही इथे फक्त मराठी माणसाचीच ‘राज’वट असेल!

मुंबई | अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहीम सुरु केली असून, हा वाद जोरात पेटण्याची चिन्हे आहेत. मनसेनं इशारा दिल्यानंतर अ‍ॅमेझॉनने न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने मसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावल्यानंतर मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे.”महाराष्ट्र सैनिकांनी मुजोरांना कसं प्रत्युत्तर दिलंय याचे इतिहासात दाखले आहेत आणि भविष्यात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील,” असं म्हणत मनसेनं नोटिसीनंतर गर्भित इशारा दिला आहे. त्यामुळे ५ तारखेला काय होणार मनसे काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्वाचे असाणार आहे.

आता मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून याविषयी भूमिका मांडण्यात आली आहे. “व्यापारी संकेतस्थळांच्या तंत्रप्रणालीमध्ये इतर भारतीय भाषांप्रमाणे मराठीचाही अंतर्भाव करावा म्हणून मनसेने आग्रही पाठपुरावा केला. काहींनी सकारात्मक प्रतिसाद दिला, तर काहींनी चालढकल केली त्यात सणासुदीत कुणाच्याही व्यवसायाला फटका बसू नये म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी संयम बाळगला. पण त्यानंतरही महाराष्ट्रात व्यापार करताना ‘मराठीचा अंतर्भाव करायला आम्ही बांधिल नाही’ अशी मुजोरीची भाषा केली जाणार असेल आणि त्यासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर खटला भरला जाणार असेल तर महाराष्ट्र सैनिकांनी मुजोरांना कसं प्रत्युत्तर दिलंय याचे इतिहासात दाखले आहेत आणि भविष्यात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील. महाराष्ट्रात व्यापारी राजवट खपवून घेतली जाणार नाही इथे फक्त मराठी माणसाचीच ‘राज’वट असेल!,” असा इशारा मनसेनं दिला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राबडीदेवी शिवी नाही; चंद्रकांत पाटलांकडून जितेन गजारियांच्या वक्तव्याचं समर्थन

News Desk

पंकजा मुंडेंनी परदेशातून कारखान्यासाठी पाठपुरावा केला का ? धनंजय मुंडेंचा सवाल

News Desk

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर उद्या होणार सुनावणी

Aprna