HW News Marathi
देश / विदेश

चुकून तुम्ही राज्यात पुन्हा सत्तेवर आलात तर जनता तुम्हाला दारातही उभं करणार नाही !

मुंबई। OBC आरक्षणासाठी राज्यभरात भाजपाच चक्का जाम आंदोलन आता सुरू आहे. पुण्यामध्ये पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आंदोलन पार पडले. यावेळी, ‘जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत राज्यात निवडणुका होऊ देणार नाही’, असा इशारा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंनी दिला.

एवढं छोट मन ठेवून तुम्ही मोठं होऊ शकत नाही. या सरकारला मला सांगायचंय, चुकून तुम्ही राज्यात सत्तेवर आलात भविष्यात जनता तुम्हाला दारात देखील उभं करणार नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय. सरकारने फक्त १५ महिने गोल गोल फिरवलं, कुठलाही डाटा कोर्टात जमा केला नाही, अशी घणाघाती टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर केली.

‘सरकारच्या नाकर्तेपणामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले आहे. हे सरकार सत्तेत आल्यानंतर इम्पिरिअल डेटा सादर करू शकले नाही. गेल्या १५ महिन्यांपासून या सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही, अशी टीकाही पंकजा मुंडेंनी केली. पंकजा मुंडे यांनी चक्काजाम केल्यानंतर

प्रीतम मुंडे पोलिसांच्या ताब्यात

परळीमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत चक्काजाम आंदोलन सुरू आहे. चक्काजामला जाण्यापूर्वी खासदार प्रीतम मुंडे यांनी ओबीसीचे नेते स्व गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. बीड जिल्ह्यात तब्बल २४ ठिकाणे चक्का जाम आंदोलन केले जात आहे.आणि आता आताची सर्वात मोठी बातमी ही आहे की, बीडच्या इटके कॉर्नर परिसरात चक्काजाम आंदोलनाला प्रीतम मुंडे यांनी दोन तास हजेरी लावल्यानंतर आत्ता त्या चक्काजाम आंदोलनातून खासदार प्रीतम मुंडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलय.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये तगडा पोलिस बंदोबस्त केला असून आंदोलनामध्ये अनुचित प्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.चक्काजाम नंतर राज्य सरकारनेओबीसी अरक्षणा संदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन तीव्र असेल असा इशारा खासदार प्रीतम मुंडे यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नववारी साडी नेसून पार केली 42 किलोमीटरची स्पर्धा

News Desk

एससीएसटी कायद्यातील तरतूदींना सर्वोच्च न्यायालयाकडून मान्यता

swarit

सुषमा स्वराज यांचे पार्थिव पाहून एमडीएचच्या आजोबांनी हंबरडा फोडला

News Desk