HW News Marathi
Covid-19

…बोलत राहिलास तर ट्रेलर देईन, निलेश राणेंचा रोहित पवारांना इशारा

मुंबई | राज्यातील साखर उद्योगांना वाचविण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काहीच दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले होते. त्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवारांवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला. शरद पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि निलेश राणेंमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ट्विटरवर जबरदस्त शाब्दिक युद्ध रंगले आहे. मात्र, आता या वाकयुद्धाला अत्यंत जहरी आणि आक्रमक स्वरूप आल्याचे पाहायला मिळत आहे. निलेश राणेंनी रोहित पवारांना प्रत्युत्तर देताना अत्यंत आक्रमक भाषेचा वापर केल्याचे पाहायला मिळत आहे.

“बोलणाऱ्याची लायकी बघून उत्तर देतो मी. धमकी आणि कळ काढायची भाषा माझ्याबरोबर करायची नाही. प्रदर्शन नाही हा ट्रेलर आहे. तुझं काम माहीत आहे मला, बोलत राहिलास तर त्याचाही ट्रेलर देईन. मग लोकंच चपलेच्या प्रदर्शनात बसवतील तुला”, असे ट्विट निलेश राणेंनी रोहित पवारांना उद्देशून केले आहे. त्यापूर्वी रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये “आपले विचार, आपली भाषा व आपलं काम यातून आपण कोण आहोत हे लक्षात येतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात, पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो”, असे म्हटले होते.

साखर उद्योगाला वाचवण्याची मागणी करणारे पत्र जेव्हा शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना लिहिले तेव्हा निलेश राणेंनी टीकेचे शस्त्र उगारले होते. “साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर audit झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा??”, असे ट्विट निलेश राणेंनी केले होते. त्यानंतर रोहित पवारांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आणि हे शाब्दिक युद्ध सुरु झाले.

राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी देखील निलेश राणे आणि रोहित पवारांच्या या वादात उडी घेतल्याने निलेश राणेंनी प्राजक्त तनपुरे यांच्यावरही अत्यंत खालच्या भाषेत टीका केल्याचे पाहायला मिळाले. निलेश राणेंनी तनपुरे यांच्यावर टीका केल्याचे रोहित पवार यांनी तनपुरे यांना समजवताना केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणतात कि, “आपले विचार, आपली भाषा व आपलं काम यातून आपण कोण आहोत हे लक्षात येतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात, पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ७९० नवीन रुग्णांचे निदान, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२ हजार २९६ वर पोहोचली

News Desk

पुण्यात २ स्वयंसेवकांना दिला ‘कोविशिल्ड’ लसीचा डोस 

News Desk

राज्यात ५ टप्प्यांत जिल्हे होणार अनलॉक! विजय वडेट्टीवारांची मोठी घोषणा

News Desk