HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री करायचा तर माझ्याच गटाचा करा, नाही तर बहुमत चाचणीला तयार राहा!

चंदीगड। पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावावर काँग्रेसकडून चर्चा सुरू असतानाच आता कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दंड थोपाटले आहेत. मुख्यमंत्री करायचाच असेल तर तो माझ्या गटातील करा. नाही तर बहुमत चाचणीसाठी तयार राहा, असा इशाराच अमरिंदर सिंग यांनी हायकमांडला दिला आहे. त्यामुळे पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचा तिढा आणखीनच वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना फोन करून हा इशारा दिल्याचं सांगितलं जात आहे. माझ्या समर्थक आमदाराला मुख्यमंत्री नाही केलं तर फ्लोअर टेस्टला सामोरे जाण्यासाठी तयार राहा, असं सिंग यांनी हायकमांडला सांगितल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्याची निवड करणं काँग्रेससाठी डोकेदुखी झाली आहे.

सिद्धू गटाने डोकं वर काढू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं सांगितलं

दरम्यान, काँग्रेस हायकमांडने पंजाबचा मुख्यमंत्री आजच निवडण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी त्यांनी आमदारांची बैठकही रद्द करण्यात आली आहे. अंबिका सोनी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्याचंही हायकमांडने ठरवलं होतं. पण सोनी यांनी नकार दिल्याने मुख्यमंत्रीपदाचा पेच आणखीनच वाढला आहे. आज 11 वाजता आमदारांची बैठक होती. मात्र, सिद्धू समर्थक या बैठकीत सिद्धू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता असल्याने हायकमांडने ही बैठकच रद्द केली आहे. सिद्धू गटाने डोकं वर काढू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. तसेच सिद्धू यांना त्यांच्या समर्थकांना शांत करण्याचा सल्लाही देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मुख्यमंत्री पदासाठी फायनल केल्याचंही सांगितलं जात आहे

सूत्रांच्या मते अंबिका सोनी यांचं नाव पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी फायनल झालं आहे. फक्त आज त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. अंबिका सोनी या सोनिया गांधी यांच्या अंत्यत जवळच्या समजल्या जातात. त्या माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेत्या आहेत. सिद्धू यांना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतरही सिद्धू आणि अमरिंदर सिंग गटाच्या कुरघोडी सुरूच राहू शकतात. सिद्धू गटाने जाखड यांना विरोध केल्याने जाखड यांच्याकडे मुख्यमंत्रीद जाखड आणि सिद्धू गटातही तू तू मै मै होऊ शकते. त्यामुळेच अंबिका सोनी यांचं नाव फायनल केल्या गेल्याचं सांगितलं जात आहे. अंबिका सोनी यांना मुख्यमंत्रीद दिल्यास गटातटाच्या राजकारणाला तिलांजली दिली जाऊ शकते. तसेच दीड वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीत त्याचा काँग्रेसला फटका बसणार नाही, म्हणूनच सोनी यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी फायनल केल्याचंही सांगितलं जात आहे. शिवाय सोनी या हिंदू खत्री असल्यानेही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही’, फडणवीसांचा गंभीर आरोप!

News Desk

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अन्य पक्षात संवाद साधण्यापेक्षा स्वतःच्या पक्षात संवाद साधण्याची गरज – आशिष शेलार

News Desk

“२-३ महिने शेतकरी तिथे आंदोलन करतायत, त्यावेळी का नाही काही मत व्यक्त केलं, कुणी थांबवलेलं होतं?” उपमुख्यमंत्र्यांनी सेलिब्रेटिंना सुनावले

News Desk