Connect with us

क्राइम

अवैध गर्भपात प्रकरणी डॉ. मुंडे दाम्पत्याला सक्त मजुरीची शिक्षा

News Desk

Published

on

बीड | राज्यभर खळबळ उडविणाऱ्या अवैध गर्भपात प्रकरणात बीड जिल्ह्यातील डॉ. मुंडे दाम्पत्याला न्यायालयाने दोषी ठरविले आहे. या प्रकरणात परळी येथील बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने डॉ. सुदाम मुंडे, पत्नी डॉ. सरस्वती मुंडे आणि महादेव पटेकर यांना दोषी अढळले असून १० वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. या तिघांना प्रत्येक ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच या प्रकरणातील ११ आरोपींना सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले आहे.

मे २०१२ मध्ये परळीत सुदाम मुंडेच्या हॉस्पिटलमध्ये विजयमाला पटेकर या महिलेचा बेकायदेशीर गर्भपात करताना मृत्यू झाला होता. या प्रकरणी कलम ३०४, ३१२, ३१४, ३१५ आणि ३१६ नुसार गुन्हा दाखल झाला होता. यात पीसीपीएनडीटी आणि एमटीपी कायद्यानुसार, सेक्शन ३अ, सेक्शन ९, सेक्शन १७, सेक्शन २९  नुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे. या सोबतच एमटीपी कायद्यानुसार सेक्शन ४ आणि ६ चा गुन्हा या दाम्पत्यावर दाखल झाला होता.

 

 

 

 

क्राइम

१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू बकरला दुबईत अटक

News Desk

Published

on

मुंबई | १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील  मोस्ट वाँटेड अबू बकर आरोपीला दुबईत अटक ठोकण्यात आल्या आहेत. या मोस्ट वाँटेंड आरोपीचे ओळख अबू बकरसह अन्य एका आरोपीला पकडण्यात आले आहे. आंतराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या कारवाई दरम्यान हे दोघे हाती लागल्याने सुरक्षा यंत्रणांचे मोठे यश मानले जात आहे. बकरला अटक ही भारतीसाठी तपास यंत्रणांना मिळालेले मोठे यश मानले जात आहे.

अबू बकर याने मुंबईच्या १९९३ स्फोट घडवून आणण्यासाठी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सोबत संधान साधले होते. त्याआधी पाकिस्तानात त्याने ट्रेनिंग देखील घेतले होते. त्यानेच आरडीएक्स मुंबईत पोहोचवले होते. त्याच्या अटकेमुळे आणखी काही गोष्टी उघडकीस  येईल असा विश्वास मुंबई पोलिसांना वाटले आहे. या दोन्ही आरोपींच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय तपास यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तो मोहम्मद आणि मुस्तफा डोसासोबत तस्करीमध्ये सहभागी होता. अबू बकर याने सोने, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आखाती देशांमधून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी केली होती.

१२ मार्च १९९३ रोजी मुंबईतील विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये २५७ जणांचा मृत्यू झाला होता. तर सातशेहून अधिक जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहीम हा अद्याप फरार आहे. या प्रकरणाती अन्य एक आरोपी याकूब मेमन याला फाशी देण्यात आली असून, मुस्तफा डोसा याचा २०१७ साली मृत्यू झाला होता.

Continue Reading

क्राइम

पुढच्या २ वर्षांमध्ये ठेवीदारांचे सर्व पैसे परत करू शकेन ! 

News Desk

Published

on

पुणे । माझ्या हातात असलेले प्रकल्प पूर्ण करून पुढच्या दोन वर्षांमध्ये ठेवीदारांचे सर्व पैसे परत करून देखील माझ्याकडे काही रक्कम शिल्लक राहील, असा दावा माहिती बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी सोमवारी (११ फेब्रुवारी) न्यायालयात केला. दरम्यान, विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. जी व्यक्ती २०१४ ते २०१७ पर्यंत प्रकल्प पूर्ण करू शकली नाही, ती व्यक्ती पुढच्या दोन वर्षात हे प्रकल्प कसे पूर्ण करणार ?, असा सवाल प्रवीण चव्हाण यांनी उपस्थित केला.

म्हाडासोबतचे अनेक प्रकल्प पूर्ण करण्यात आले असून ठेवीदारांचे ५०१ कोटी रुपये देणे सहज शक्य असल्याचे डीएसके यांनी न्यायालयात सांगितले. चव्हाण यांनी मात्र याला विरोध करत डीएसके न्यायालयाची दिशाभूल करत असल्याचे म्हटले आहे. आजपर्यंत ठेवीदारांचे तब्बल १ हजार २८६ कोटी बँकांचे १ हजार ६५० कोटी, तर एमसीडीचे १३५ कोटी रुपये देणे बाकी आहेत. असे असताना डीएसके प्रकल्पासाठी पैसे कुठून आणणार, असा प्रश्न चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला.

Continue Reading
February 2019
M T W T F S S
« Jan    
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728  

महत्वाच्या बातम्या