HW News Marathi
राजकारण

अजित पवार निवडणूक लढविणार नाही | शरद पवार

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांची शिरूर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांच्या इच्छेला ब्रेक लावला आहे. बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, शिरूरमधून अजित पवार ही निवडणूक लढविणार नाही. माझ्याकडे अजून पाच ते सहा दावेदार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. पवारांनी ज्याप्रमाणे अजित पवारांच्या उमेदवारीवर पूर्णविराम लावला आहे. त्यावरून काका-पुतण्यात सर्व काही आलबेल आहे असे वाट नाही.

पुण्यातील बारामती वसतीगृहामध्ये राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची आज (८ फेब्रुवारी) बैठक पार पडली आहे. या बैठकीत अजित पवार निवडणूक लढविणार नसल्याचे कळताच, राजकीय वर्तुळात अजित पवारांच्या उमेदवारीवरून चर्चा रंगू लागल्या आहेत. या बैठकीत शरद पवार यांनी माढातून निवडणूक लढवावी, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच शरद पवार निवडणूक लढवणार नाहीत, असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे.

 

Related posts

शिवसेना – भाजप युती तुटणार ही केवळ अफवा ?

News Desk

मोदी सरकारने देशाच्या हिताच्या दृष्टीने चांगले काम केले | शिवसेना

News Desk

शपथ घेताच कमलनाथ यांनी केले शेतकऱ्यांचे कर्ज माफ

News Desk