HW News Marathi
महाराष्ट्र

अन्याय करणाऱ्यांच्या  नरडीचा घोट घेणारा मी पँथर – आठवले

सातारा | आंबेडकरी विचार आणि निळ्या झेंड्याशी मी एकनिष्ठ आहे. केंद्रियमंत्रीमंडळात जरी प्रधानमंत्री असले नरेंद्र मोदी तरी मी आहे आंबेडकरवादी असे सांगत कुठे जर दलितांवर अन्याय अत्याचार झाला तर अन्याय करणाऱ्यांच्या नरडीचा घोट घेणारा पँथर मी काल होतो आणि आजही आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.

पाटण तालुक्यातील डावरी या गावात तथागत भगवान बुद्ध; छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव आणि गुणवंत शालेय विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ना रामदास आठवले बोलत होते. यावेळी स्थानिक शिवसेना आमदार शंभूराज देसाई ;संपादक बबन कांबळे ; रिपाइं चे सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड प्रा. विलास आढाव ; किशोर तपासे ; कुणाल कांबळे; चंद्रशेखर कांबळे ; डॉ विजय मोरे; हेमंत रणपिसे ; सचिन बनसोडे; विशाल वाघमारे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संपादक बबन कांबळे यांच्या मातोश्री हौसाबाई कांबळे यांचा त्यांनी बुद्धविहाराला आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यासाठी जमीन दान दिल्याबद्दल ना रामदास आठवले यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी विदिशा कुणाल कांबळे या 4 वर्षांच्या मुलीने बुद्धवंदना म्हणून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगली जिल्ह्यात मटक्याने पाय पसरले

swarit

माजी खासदार किरीट सोमय्या आज बीडमध्ये; पत्रकार परिषदेकडे लक्ष

News Desk

मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाल्यामूळे मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

News Desk