HW News Marathi
Covid-19

GST परिषदेच्या बैठकीत मोठी घोषणा, कोरोनाशी संबंधित वस्तूंवर ३१ ऑगस्टपर्यंत आयात शुल्क माफ

नवी दिल्ली | कोरोना संकटाची परिस्थिती लक्षात घेता अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोठी घोषणा केलीय. GST शी संबंधित वस्तूंवर आयात शुल्क 31 ऑगस्टपर्यंत माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सध्याची परिस्थिती आणि उद्योगाची मागणी लक्षात घेता अर्थमंत्र्यांनी कोविडशी संबंधित मालावर आयात शुल्क लावले जाणार नाही, असा निर्णय घेतला.

जीएसटीची ही बैठक कोरोनाच्या काळात जवळपास सात महिन्यांनंतर झालीय. कोरोनाची दुसरी लाट पाहता जीएसटी परिषदेच्या या 43 व्या बैठकीत सरकारने कोरोनाशी संबंधित वस्तूंवर दिलासा देण्याचा निर्णय घेतला

जीएसटीमध्ये कोविड उपकरणांवर त्वरित सवलत

कोरोना मेडिसिन आणि उपकरणांवरील जीएसटीमधील कपात करण्याबाबत निर्मला सीतारमण म्हणाल्या की, या विषयांवर गंभीर चर्चा झालीय. बर्‍याच बाबींवर चर्चा झालीय. जीएसटी कौन्सिलने 31 ऑगस्ट 2021 पर्यंत कोरोना उपकरणांच्या आयातीवरील जीएसटीला सवलत देण्याचा निर्णय घेतलाय. जीएसटीमध्ये त्वरित सवलत कोविड उपकरणावर देण्यात आली आहे.

करात सूट देण्यासाठी मंत्रालयांचा एक गट तयार करण्यात आलाय. इतर कोणत्याही उपकरणांवर कर कमी करायचा की नाही, याबाबत 8 जूनपूर्वी अंतिम निर्णय घेण्यात येईल. काळ्या बुरशीची वाढती प्रकरणं लक्षात घेऊन सरकारने अ‍ॅम्फोटेरिसिन बीला जीएसटीमधून सूट देण्याच्या प्रकारात समाविष्ट केले आहे.

लहान करदात्यास खूप मोठा दिलासा

छोटे व्यापारी आणि करदात्यांचे हित लक्षात घेता सरकारने कर्जमाफी योजनेत सवलत देऊन लेट फी कमी केलीय. कोरोना लसीकरणाबाबत निर्मला सीतारमण म्हणाल्या की, दोन लस उत्पादक (सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक) यांना 4500 कोटी रुपये देण्यात आलेत. लस उपलब्ध होण्याबाबत जपान आणि युरोपियन संघाच्या लस उत्पादकांशीही सरकार संपर्कात आहे. येत्या काही महिन्यांत लसची पुरेशी उपलब्धता होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लंडनहून १० जण रत्नागिरीत, कोकणाची चिंता वाढली!

News Desk

“राजकारण न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला संजय राऊत अन् जयंत पाटलांना ?”

News Desk

कोरोना लसीकरणासाठी आता ‘कोविन’ ॲपची सक्ती रद्द!

News Desk