HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रातील‘अनलॉक’चा गोंधळ संपला! मध्यरात्री निघाले आदेश, ५ टप्प्यात हटणार निर्बंध

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या ७ जूनपासून ५ टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी २ दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत अनलॉकबाबतची माहिती दिली होती. मात्र, राज्य सरकारने यावर असं सांगितलं की अजूनही हा निर्णय विचाराधीन आहे. त्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता.

मात्र काल मध्यरात्री याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार निर्बंधांबाबत ५ टप्पे तयार करण्यात आले आहेत. यात पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येणार आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तसेच, दर आठवड्याला कोरोना स्थितीनुसार हे जिल्हे बदलणार आहेत.

पहिला टप्पा जिथे ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ टक्के ऑक्सिजन बेड आहेत, तिथ लॉकडाऊन राहणार नाही. मॉल्स, हॉटेल्स, दुकाने यांना वेळेचे बंधन नाही. इतकंच नाही तर पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालये पूर्ण सुरू होतील, चित्रपटगृह सुरू होणार आहेत.

पाच टप्पे कसे आहेत?

पहिला टप्पा : पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के किंवा ५ टक्क्यांपेक्षा कमी तसेच ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.

दुसरा टप्पा : पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के ऑक्सिजन बेड्स २५ ते ४० टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.

तिसरा टप्पा : पॉझिटिव्हिटी रेट ५ ते १० टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे ४० टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील

चौथा टप्पा : पॉझिटिव्हिटी रेट १० ते २० टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड ६० टक्क्यांवर व्यापलेले असतील तर

पाचवा टप्पा : पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांवर आणि ऑक्सिजन बेड हे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले.

पहिला टप्प्यात सर्व सुरू राहणार आहे

  • रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील
  • खाजगी, सरकारी कार्यालये १०० टक्के सुरू होतील
  • थिएटर सुरू होतील
  • चित्रपट शुटिंगला परवानगी
  • सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना १०० टक्के सूट दिली आहे.
  • ई कॉमर्स सुरू राहिल,
  • पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही.
  • जिम, सलून सुरू राहणार आहे.
  • बस १०० टक्के क्षमतेने सुरु होतील.
  • इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील, आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल,

दुसऱ्या टप्प्यात काय सुरु राहणार?

  • ५० टक्के हाॅटेल सुरू
  • माॅल चित्रपटगृह – ५० टक्के
  • लोकल- अत्यावश्यक सेवा
  • सार्वाजिनक जागा, खुली मैदान , मार्निंग वाॅक सायकल सुरू
  • शासकीय आणि खासगी कार्यालये सगळे खुली
  • क्रीडा सायंकाळ सकाळी ५ ते ९
  • संध्याकाळी ५ ते ९ सुरू – इनडोअर आणि आऊटडोर
  • शुटिंग चित्रपट सुरू
  • सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम ५० टक्के खुले
  • लग्न सोहळा मॅरेज हाॅल ५० टक्के आणि जास्तीत १०० लोक उपस्थितीत
  • अंत्यविधी सोहळा सगळे उपस्थितीत राहता येईल
  • मिटींग आणि निवडणूक ५० टक्के उपस्थितीत
  • बांधकाम, कृषी काम खुली
  • इ काॅमर्स सुरू
  • जीम सलुन ब्युटी पार्लर, स्पा ५० टक्के सुरू
  • शासकीय बस क्षमता १०० टक्के सुरू
  • जिल्हाबाहेर जाण्यासाठी ई पास गरज नसेल, पण जिथे रेड झोन यात जाण्यास किंवा येण्यास ई पास लागेल

तिसऱ्या टप्प्यात काय सुरु राहणार?

  • अत्यावश्यक दुकाने सकाळी ७ ते ४ आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ सर्व खुले राहतील
  • माॅल्स थिएटर्स सर्व बंद राहतील
  • सोमवार ते शुक्रवार हाॅटेल्स ५० टक्के खुले दुपारी २ पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल, शनिवार रविवार बंद राहतील
  • लोकल रेल्वे बंद राहतील
  • मॉर्निंग वाॅक, मैदाने , सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ मुभा
  • ५० टक्के खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू
  • आऊटडोअर क्रीडा सकाळी ५ ते ९ सुरू सोमवार ते शुक्रवार ,
  • स्टुडियोत चित्रीकरण परवानगी सोमवार ते शनिवार करता येईल
  • मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के, सोमवार ते शुक्रवार
  • लग्न समारंभ ५० टक्के क्षमतेने तर अंत्यविधी २० लोक मुभा असतील
  • बांधकाम दुपारी दोन पर्यंत मुभा
  • कृषी सर्व कामे मुभा
  • ई कॉमर्स
  • जमावबंदी संचारबंदी कायम राहील

चौथ्या टप्प्यात काय सुरू राहणार?

  • अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते

    २ वाजेपर्यंत सुरु

  • सरकारी खासगी कार्यालयात २५ टक्के उपस्थिती राहणार
  • क्रीडा पाच ते ९ आऊटडोअर सुरु राहणार
  • सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम नाही
  • लग्न सभारंभाला २५ लोकांची उपस्थिती ठेवता येणार
  • अंतयात्रेला २० लोक उपस्थित राहणार
  • बांधकामासाठी फक्त ऑनसाईट कामगार काम करणार
  • शेतीची कामं २ वाजेपर्यंत करता येणार
  • ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी उपलब्ध
  • संचार बंदी लागू असणार
  • सलून, जिम ५० टक्के क्षमता सुरु राहणार,
  • बसेस ५० टक्के विना उभे राहणारे प्रवाशी

पाचवा टप्पा रेड झोनमध्ये मोडतो

  • पॉझिटीव्हिटी दर २० टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर तुमचा जिल्हा रेड झोनमध्ये
  • ज्या जिल्ह्यात ऑक्सिजनचे बेड ७५ टक्के फुल्ल असतील, अशा जिल्ह्यात कडक निर्बंध असतील

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पहिल्या लाटेनंतर गाफील झालो, म्हणून हे संकट उभं राहिलं – मोहन भागवत

News Desk

शेतकरी आत्महत्या लपवण्याची दिक्षा इतर राज्यांनी मोदींकडूनच घेतली !

News Desk

“पुर्ण लॉकडाऊन केला जर जनतेचा उद्रेक होईल”, फडणवीसांचा सरकारला इशारा

News Desk