HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ! राज्यात आजपासून डिजिटल शैक्षणिक वर्षाला सुरुवात

मुंबई | मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची आज (१५ जून) राज्याच्या शालेय शिक्षण विभागासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एका महत्त्वपूर्ण निर्णयाला मान्यता दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज म्हण्जेच १५ जूनपासून राज्यात ऑनलाईन / डिजिटल माध्यमातून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यास मान्यता दिली. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील अधिकृत माहिती आपल्या ट्विटर हॅन्डलवरून दिली आहे. दरम्यान, “राज्यातील या ऑनलाईन / डिजिटल माध्यमातून शैक्षणिक वर्षाबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना लवकरच कळविण्यात येतील”, असे म्हणत वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील शैक्षणिक क्षेत्रासाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुठलीही गर्दी न करता कार्तिकी वारी साधेपणाने पार पाडा – मुख्यमंत्री

News Desk

पंकजा मुंडेंनी विकास करण्याची जबाबदारी देत धनंजय मुंडेंना दिल्या शुभेच्छा…  

News Desk

दलालांचा ठेकेदार भाजपने काँग्रेसकडे बोट करू नये ! – नाना पटोले

Aprna