HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राजकीय कारकीर्द आणि बरचं काही….

मुंबई | महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून पद आणि गोपनीयतेची शपथ २८ नोव्हेंबर २०१९ ला घेतली होती. ‘मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…’ असं म्हणत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या भव्य मैदानावर हजारोंच्या जनसमुदायाच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी एक वर्षापूर्वी शपथ घेतली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन आणि आई वडिलांना स्मरुन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकासआघाडीतर्फे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहेत. शिवाजी पार्कच्या मैदानात शपथविधी सोहळा पार पडला होता. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी फक्त शिवसेनाच नाही, तर काँग्रेस, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मंचावर उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांची कारकीर्द-

गेल्या अनेक दशकांपासून मराठी माणूस, शेतकरी, कष्टकरी जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या उद्धव ठाकरे यांना त्यांचे वडील शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे, आई स्व. मीनाताई आणि आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा समृद्ध वारसा लाभला आहे.

शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी पायाभरणी केलेल्या आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाची धुरा उद्धव ठाकरे यांनी मुख्य संपादक म्हणून सांभाळली.

उद्धव ठाकरे यांचा जन्म 27 जुलै 1960 रोजी मुंबईमध्ये झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधून पदवी घेतली आहे. त्यांच्या छायाचित्रांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. एक सिद्धहस्त लेखक आणि व्यावसायिक छायाचित्रकार असलेल्या ठाकरे यांच्या कलाकृतींची दखल अनेक नामवंत मासिकांनी वेळोवेळी घेतली आहे. तसेच त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून रसिकांना घडले आहे.

राजकीय कारकीर्द –

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात विद्यार्थी दशेपासून झाली. शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रीय असलेल्या ठाकरे यांच्याकडे 1997 च्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आली. त्यांनी महापालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करीत ती यशस्वीरीत्या पूर्ण केली. या निवडणुकीने त्यांच्यातील राजकीय नेतृत्वगुण संपूर्ण राज्याने अनुभवले. 2003 मध्ये पक्षाने त्यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर 2004 मध्ये त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले.

व्यक्तीगत जीवन

उद्धव ठाकरे यांचा विवाह रश्मी ठाकरे यांच्याशी झाला असून त्यांना आदित्य आणि तेजस अशी दोन मुले आहेत. आदित्य ठाकरे आजोबा आणि वडिलांचा राजकारणाचा वसा पुढे चालवित आहेत. ते सध्या युवासेनाप्रमुख असून वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

कलात्मक पैलू

महाराष्ट्राच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा अलौकिक सौंदर्याचे मूर्तीमंत आणि विहंगम छायाचित्रण त्यांच्या ‘महाराष्ट्र देशा’ या 2010 ला प्रकाशित झालेल्या पुस्तकातून दिसून येते. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिकतेचा मानबिंदू असलेल्या ‘पंढरपूर वारी’चे आणि ग्रामीण महाराष्ट्राचे यथार्थ छायाचित्रण त्यांच्या ‘पहावा विठ्ठल’ या 2011 मधील पुस्तकाच्या माध्यमातून देशालाच नव्हे तर जगाला भूरळ घातली. आपल्या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतकरी आणि वन्यजीव संरक्षणासाठी निधी उभारून त्यांनी मदत केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील ७ लाख शिक्षकांना मिळणार अपघात विमा कवच

News Desk

भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट

News Desk

‘तिरंदाजीत भारताला पहिलं पदक!’

News Desk