मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज रात्री कोविड 19 संसर्ग टास्क फोर्सची बैठक होणार आहे. रात्री साडे आठ वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि टास्क फोर्स मधील वरिष्ठ डॉक्टर आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.मुंबईकरांना कालच लोकल प्रवासाचा दिलासा दिल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रेस्टॉरंट, मॉल आणि दुकानांच्या वेळा वाढवण्याचा विचार करत आहे. त्यासाठी लसींचे दोन डोस घेतलेल्यांना प्राधान्य दिलं जाणार हे आता स्पष्ट झालं आहे.
बैठकीत महत्वाचा निर्णय होणार
निर्बंधांमुळे मंदावलेलं मुंबई आणि ठाण्याचं अर्थ चक्र आता वेगाने पुढे नेण्यासाठी आजच्या बैठकीत महत्वाचा निर्णय होणार आहे. अद्याप धार्मिकस्थळं, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्याबाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत या बैठकीत आज निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबईची लाईफलाईन येत्या 15 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 ऑगस्टपासून लोकल सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. कोरोना लशीचे 2 डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.मुंबईमध्ये लोकल प्रवास 15 ऑगस्टपासून करता येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहे. त्यांना १४ दिवसपूर्ण झाले आहे. त्यांना हा प्रवास करता येणार आहे. या सर्व नागरिकांसाठी एक अॅप तयार केला आहे, या अॅपवर नोंदणी करावी लागणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.