नाशिक | राज्यात एकीकडे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑक्सिजनची कमतरता भासत असताना दुसरीकडे नाशिकमध्ये ऑक्सिजनची गळती होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक पालिकेच्या झाकीर रुग्णालयात हा प्रकार घडला आहे.या ऑक्सीजन गळतीमुळे ११ रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
झाकीर हुसेन हे नाशिक पालिकेचं रुग्णालय असून या रुग्णालयात १७१ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर व्हेंटिलेटवर ६७ रुग्ण आहेत. दरम्यान, या ऑक्सिजन गळतीने बराच वेळ ऑक्सिजन पुरवठा बंद झाला होता.
गॅसगळती होत असलेल्या ठिकाणी तात्पुरती दुरूस्ती करुन गॅस गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले. गॅस प्लांटचे देखभाल करणारे तज्ज्ञ टेक्निशियन यांना पाचारण करण्यात आले. टेक्निशियन टँकमधील गॅस गळतीचे शोध घेऊन दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. तत्काळ घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळले. महापालिका डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात कोरोना रुग्ण उपचारार्थ दाखल असून काही काळ रुग्णालयात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णालय परिसरात गॅस पसरले असले तरी धोक्याची स्थिती नाही गॅस गळती दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.
#WATCH | An Oxygen tanker leaked while tankers were being filled at Dr Zakir Hussain Hospital in Nashik, Maharashtra. Officials are present at the spot, operation to contain the leak is underway. Details awaited. pic.twitter.com/zsxnJscmBp
— ANI (@ANI) April 21, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.