HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या निवेदनातील महत्वाचे मुद्दे

मुंबई | राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मला कल्पना आहे कोरोनाचा रुग्ण आपल्या राज्यात सापडून आता ४ आठवडे पूर्ण झाले. आपल्याकडे रुग्णांचे आकडे वाढताहेत ही वस्तुस्थिती आहे, चिंतेची बाब असली तर घाबरून जाऊ नका. आपण सर्व ताकदीनिशी प्रयत्न करीत आहोत. आपल्याकडे मला रुग्णांमध्ये थोडीशीही वाढ नको, असे ते यावेळी म्हणाले. कोरोना आपल्यामागे लागला आहे. पण आपण ही सर्व जण कोरोनाच्या मागे “हात धुवून” लागलो आहोत.

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे घरातल्या घरा योगासने, हलके फुलके व्यायाम करा. कारण हे युद्ध आपण जिंकणारच आहोत. पण यानंतरचे युद्ध घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेशी आहे. त्यासाठी आपली पूर्ण ताकद, हिम्मत लागणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आज (८ एप्रिल) सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेशी संवाध साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लाईव्ह प्रसारणातील मुद्दे

  • कोरोनाच्या लढाईत आरोग्य यंत्रणा, पोलीस अहोरात्र काम करताहेत पण प्रथमच मी आपल्या यंत्रणेतील सर्व विभागांना धन्यवाद देतोय.
  • काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व जण मास्क लावून बसलेले छायाचित्र आपण पाहिले असेलच. ही पहिली अशी व्हीडीओ कॉन्फरन्स होती. सर्व मंत्र्यांनी एकमेकांत अंतर पाळले होते, मात्र मानसिकदृष्ट्या आम्ही एक होतो आणि आहोत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी एक टीम म्हणून त्यांनी बऱ्चयाच सुचना केल्या आहेत.
  • मला कल्पना आहे कोरोनाचा रुग्ण आपल्या राज्यात सापडून आता ४ आठवडे पूर्ण झाले. आपल्याकडे रुग्णांचे आकडे वाढताहेत ही वस्तुस्थिती आहे, चिंतेची बाब असली तर घाबरून जाऊ नका. आपण सर्व ताकदीनिशी प्रयत्न करीत आहोत. आपल्याकडे मला रुग्णांमध्ये थोडीशीही वाढ नको असे मी सांगितले आहे.कोरोना आपल्यामागे लागला आहे पण आपण ही सर्व जण कोरोनाच्या मागे “हात धुवून” लागलो आहोत.
  • लॉकडाऊन मुळे आपली गैरसोय होते आहे. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो पण हे युद्ध जिंकायचे असेल तर आपली घरे हेच गड किल्ले आहेत असे समजा. घरातले वातावरण आनंदी ठेवा.
  • माझे टीव्ही वाहिन्यांना देखील आवाहन आहे की कोरोनाच्या बातम्या तर आहेतच पण नागरिक तणावमुक्त राहतील आणि वातावरण हलकेफुलके राहील असे कार्यक्रम दाखवा
  • ज्यांना ज्यांना ह्रदयविकार, मधुमेह, स्थूलपणा आहे त्यांनी अधिक काळजी घ्या. बंधने ठेवा, कारण हे सर्व हाय रिस्क ग्रुप मध्ये आहेत्. घरी राहा पण तंदुरुस्त रहा
  • योगासने, हलके फुलके व्यायाम करा. कारण हे युद्ध आपण जिंकणारच आहोत पण पण यानंतरचे युद्ध घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेशी आहे. त्यासाठी आपली पूर्ण ताकद, हिम्मत लागणार आहे.
  • जगभरातल्या बातम्या येताहेत. अमेरिका जपान, सिंगापूर येथील एकदा वाढतोय पण कालच बातमी आली की चीनच्या वूहान मध्ये निर्बंध आता उठविण्आयात आले आहेत. ही दिलासा देणारी बातमी आहे. त्याना यासाठी ७०-७५ दिवस लागले. आपण जर असाच दक्षतेने सामना केला तर आपल्याकडे देखील ही परिस्थिती बदलेल. मला खात्री आहे, आपण निश्चित बाहेर पडणार .
  • जे गरीब आहेत, गरजू आहेत त्यांच्यासाठी आपण राज्यात शिव भोजनाची सोय केली आहे. सोय केली आहे.

    निवारा केंद्रात ६ लाख लोकांना दिवसांतून दोन वेळेस जेवण, नाश्ता देत आहोत.

  • माणुसकी हाच एक धर्म आहे जो आम्ही पळत आहोत.
  • केशरी शिधापत्रिका धारक मध्यमवर्गीय आहे त्यांच्यासाठी ३ किलो गहू 8 रुपये किलो दराने व २ किलो तांदूळ १२ रुपये किलो दराने देण्यासंदर्भात आम्ही निर्णय घेतला आहे. मी पंतप्रधानांना यासंदर्भात किमान आधारभूत किंमतीत धान्य यासाठी मिळावे अशी विनंतीही केली आहे.
  • केंद्राने जाहीर केलेल्या मोफत धान्याचे वाटपही सुरु झाले आहे. केंद्राचे चांगले सहकार्य मिळते आहे

    मास्क, पीपीई किट्स चा तुटवडा जगभर आहे. आता आपल्या देशात महाराष्ट्र, गुजरात मध्ये व्व्हेंटिलेटर बनविणे सुरु आहे. पीपीई कीट सारख्या काही गोष्टी आपण बनवत आहोत.

  • सर्व सुविधा वाढवतोय पण रोगाचे स्वरूप लक्षात घेता या सुविधा, उपकरणे प्रमाणित असणे गरजेचे आहे हे लक्षात घ्यावे

    आपण जर घराबाहेर वस्तूंसाठी घराबाहेर पडणार असणार तेव्हा पुढचे काही दिवस मास्क वापरले पाहिजेत. त्यात गैर काहीच नाही. घरातल्या स्वच्छ कापडाने चेहरा कव्हर करता येऊ शकतो. पण छत्रीसारखा तो घरातल्या सर्व सदस्यांनी एकच वापरायचा नाही. वापरलेले मास्क कचऱ्यात तसेच फेकून न टाकता काळजीपूर्वक आणि सुरक्षित जागा पाहून जाळून टाका.

  • फिव्हर क्लिनिक आम्ही सुरु केले आहेत तिथेच आपली तब्येत दाखवा
  • कोविड उपचारासाठी आम्ही रुग्णालयांची विभागणी केली आहे. ज्यांना सौम्य लक्षणे असतील , मध्यम स्वरुपाची , तसेच कोरोना शिवाय इतर ही रोग असतील अशी तीन रुग्णालयांची विभागणी केली असेल. त्यात निष्णात डॉक्टर असतील

    निवृत्त सैनिक आहेत, ज्यांना आरोग्य सेवेचा अनुभव आहे . अनेक वोर्ड बॉय, निवृत्त परिचारिका, वैद्यकीय सहायता प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्ती ज्यांना सध्या काम मिळालेले नसेल त्यांना सहभागी करून घेउत , त्यांना मी आवाहन करतोय की महाराष्ट्राला आपली गरज आहे. केवळ अशांनी Covidyoddha@gmail.com या इमेलवर आपली माहिती द्यावी.

  • आजमितीस ८० जण बरे होऊन घरी गेले आहे. ६४ मृत्यू झाले आहेत.
  • मुंबई-पुण्यात घरोघर चाचण्यांची संख्या वाढवतोय. जलद चाचणी, वैद्यकीय उपकरणे आम्ही प्रमाणित करून घेतोय

    एकूणच काय चिंता आहे पण घाबरून जाऊ नका

  • शून्यावर आकडा आणायचा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी मुख्यमंत्री नाही, यावर विश्वास बसायला मला दोन दिवस लागले !

News Desk

लॉकडाऊनमध्ये शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थी, पालकांकडून शिक्षण शुल्क भरण्याची सक्ती करू नये !

News Desk

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थानच्या विकासासाठी अर्थसंकल्पात ७४ कोटींची तरतूद केल्याबद्दल मंदिर देवस्थानाकडून उपमुख्यमंत्र्यांचे आभार

News Desk