HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पातील ‘या’ महत्त्वाच्या तरतुदी

मुंबई | गत वर्षी राज्याचा २०१९-२० माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला होता. २०१४मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात काही लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या होत्या. ६ जिल्ह्यात ४४६१ कोटी अनुदान वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांची वीज खंडित न करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

दुष्काळाची भीषणता पाहाता राज्यातील १५१ जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला. तसेच १६३५ चारा छावण्या राज्यभरात उभारण्यात आल्या. चारा छावण्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. अर्थसंकल्पात जलसिंचनासाठी १ हजार ५३० कोटींची तरदूत करण्यात आली होती. २६० जलसिंचनाची कामे प्रगती पथावर होते. जलयुक्त शिवारासाठी ८९४९ कोटी खर्च करण्यात आला. गेल्या चार वर्षात १४० सिंचन योजना पूर्ण करण्यात आल्या. कृषी संचिन योजनेसाठी २ हजार ७२० कोटीची तरदूत करण्यात आली. ४ कृषी विद्यापीठांना ६०० कोटींची तरदूत राज्य सरकारने केली आहे.

भाजप सरकारच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतूद

  • १२ बलुतेदारांना सुक्ष्म उद्यगातून सक्षम करण्यासाठी १०० कोटींची निधी
  • तिर्थक्षेत्रातील बस स्थानकांच्या नुतनीकरणासाठी १०० कोटी रुपयांची तरदूत करण्यात येणार
  • सायन-पनवेल महामार्गावरील पुलासाठी ७७५ कोटी रुपयांची तरदूत
  • महात्मा गांधींच्या १५०व्या जयंती निमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमासाठी १५० कोटी रुपय
  • राज्यात लवकरच १० हजार लुघ उद्याग सुरु करणार
  • कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ११४ कोटी निधी देणार
  • गोवर्धन योजनेत आतापर्यंत ११७ कोटी रुपये खर्च
  • गोपीनाथ मुंडे विमा योजनेत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा समावेश करण्यात येणार आहे
  • १३९ गोशाळांसाठी प्रत्येक २५ लाख अनुदार देणार
  • पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई नियंत्रण कक्षाची स्थापना
  • दुष्काळी भागात मागले त्यांना शेततळे देण्यात आली
  • १ लाख ६७ शेततळ्याची कामे पूर्ण करण्यात आली
  • राज्यातील १५१ जिल्ह्यात दुष्काळ जाहीर
  • राज्यातील दुष्काळ पाहता
  • पाण्याची टंचाई दुर करण्यासाठी अनेक योजना जाहीर
  • शेतकऱ्यांची विज खंडती न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
  • जलसिंचनासाठी १ हजार ५३० कोटींची तरदूत करण्यात आली
  • २६० जलसिंचनाची कामे प्रगती पथावर आहेत
  • जलयुक्त शिवारासाठी ८९४९ कोटी खर्च करण्यात आला
  • गेल्या चार वर्षात १४० सिंचन योजना पूर्ण करण्यात आल्या
  • जल सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधी दिला जाईल
  • कृषी संचिन योजनेसाठी २ हजार ७२० कोटीची तरदूत करण्यात आली
  • महाराष्ट्रातील दुष्काळी भागात १ हजार ६३५ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहे.
  • चारा छावण्यांना टँकरद्वारे पाणी पुरविठा करण्याचा निर्णय घेतला
  • ४ कृषी विद्यापीठांना ६०० कोटींची तरदूत राज्य सरकारने केली आहे.
  • शेळ्या आणि मेंढ्यासाठी देखील चारा छावण्यांची निर्मिती राज्या सरकार करणार आहे.
  • काजू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी १०० कोटींची तरदूत करण्यात आली.
  • काजू उत्पादनात महाराष्ट्र देशभरात अग्रेसर आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार – मुख्यमंत्री 

News Desk

“दोन पक्षांनतर तिसऱ्या पक्षातील प्रकरणही बाहेर येईल”, रामदास आठवलेंचा कॉंग्रेसवर निशाणा

News Desk

दहीहंडी साजरी करण्यावर मनसे ठाम असल्याने अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात!

News Desk