HW News Marathi
Covid-19

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना कोरोनाची लागण

औरंगाबाद | राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. सामान्य नागरिकांसोबत नेत्यांनाही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाची लागण झालेल्या राज्यातील बड्या नेत्यांमध्ये आता औरंगाबादचे एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांची भर पडली आहे. इम्तियाज जलील यांनी ट्विटवरुन ही माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून इम्तियाज जलील यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्यामुळे जलील यांनी कोरोना चाचणी करवून घेतली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता इम्तियाज जलील यांनी स्वत:ला आयसोलेट करुन घेतले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे सरकारमधील अनेक बड्या नेत्यांना कोरोनची लागण झाली आहे. यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे, छगन भुजबळ, जयंत पाटील, बच्चू कडू, एकनाथ खडसे, राजेंद्र शिंगणे यांचा समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन

News Desk

Lockdown | बीड जिल्ह्यात ७ दिवस लॉकडाऊन

News Desk

आता १० अंकांचा मोबाइल ११ अंकी करण्याच्या ट्रायने दिल्या सूचना

News Desk