HW News Marathi
Covid-19

महापौरांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मांडली पुण्यातील कोरोनास्थिती

पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (३० जुलै) पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील विधानभवन सभागृहात कोरोनास्थितीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक झाली. या बैठकीत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे मांडलेले आहेत.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मांडलेले मुद्दे

१) ऑक्सिजन व आयसीयू बेडस, व्हेंटिलेटरची कमतरता.

२) टेस्टिंगची क्षमता वाढविणे.

३) खाजगी हॉस्पिटलवरचे नियंत्रण.

४) महापालिकेस आर्थिक मदत.

५) मृत्यूची चौकशी करावी, त्यामधील दोष दूर करून मृत्यूदर नियंत्रणात आणावा.

खाजगी हॉस्पिटल, बेड्स आणि अवाजवी बील

– ८०% बेड्स ताब्यात घेण्याचे आदेश आहेत, मात्र कार्यवाही नाही

– बिलामध्ये नागरिकांची प्रचंड लूट असल्याच्या तक्रारी आहेत, त्यामुळे बिलांचे प्रिऑडिट करावे

– सेंट्रली बेड्स मॅनेजमेंट तातडीनं करण्यात यावे

(ससून /मनपा /खाजगी हॉस्पिटल)

– खाजगी लॅबवर तूर्त तरी कोणतेही नियंत्रण नाही आणि प्रशासनाचा लॅबशी समन्वय नाही.

– उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नेमले आहेत, त्यांची यावर नियंत्रण आणावे

महापालिका आर्थिक स्थिती

– ४ हजार ४४३ कोटी जमा

– ३००० कोटी – महसुली / मॅन्डेटरी खर्च / पगार / मेन्टेनन्स

– १४०० – विकासकामे (६५० कोटी मागील वर्षीच्या विकासकामे)

– शिल्लक ८०० कोटी

– जवळपास ३०० कोटी + ७५ कोटी जम्बो सेंटरला

– भांडवली कामांसाठी शिल्लक ४०० कोटी राहिले, यासाठी दरवर्षी ३००० कोटींची कामे होतात.

– हा सर्व विचार करता राज्य सरकारने तातडीनं आर्थिक मदत जाहीर करावी

कोरोनाबाधित रुग्णांचा आगामी अंदाज

– ५५ हजार होणार जुलैअखेर (अंदाज ४६ हजार इतका होता)

– आज २९ जुलै रोजी एकूण रुग्ण एकूण ५१ हजार ७३८ तर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १७ हजार ८६१ इतकी आहे.

अंदाज

१५ ऑगस्ट – एकूण १ लाख रुग्ण

३१ ऑगस्ट – एकूण २ लाख रुग्ण

– यामुळे बेड्सचीची कमतरता, ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्स मोठ्या प्रमाणावर लागतील.

– जम्बो सेंटर उभे उभारणीपर्यंत व्यवस्थाही अपुरी, त्याची सोय तातडीनं करण्यात यावी.

– ७ हजार ऑक्सिजन बेड्स, ४ हजार ०६५ आयसीयू बेड्स आणि १ हजार ९०० व्हेंटिलेटर बेड्सची आवश्यकता असणार आहे.

मृत्यूंचे प्रमाण व अवस्था

ससून रुग्णालयात दररोज रोज १२ मूत्यू कोरोनाव्यतिरिक्त होत आहेत, ही संख्या खाजगी हॉस्पिटलमध्ये महिन्याला ५० ते १००; म्हणजेच ढोबळपणे अधिक ४०० ते ५०० मृत्यू कोरोनाचे असतात, पण ते आकडेवारीत दर्शविले जात नाहीत.

– टेस्ट न होता हे मृत्यू होत आहेत, यात काही मृत्यू हॉस्पिटल पोहोचण्यापूर्वीचे आहेत.

– छातीच्या एक्स-रे ने अनेकांना कोरोनाचे निदान झाल्याची माहिती आहे.

– याबाबत सविस्तर चौकशी करुन भविष्यातील या मृत्युंची संख्या कमी करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत.

टेस्टिंग क्षमता वाढविणे

– NIV आणि ससूनमध्ये चाचणीची मर्यादित क्षमता असल्याने ससूनमध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठीची यंत्रणा उभी करणे याबाबत दोन महिने चर्चाच होत आहे, ही यंत्रणा त्वरित कार्यान्वित करण्यात यावी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात ६४२७, तर देशात २३,०७७ कोरोनाबाधित

News Desk

मुंबईत कोरोनाची लस घेतल्यानंतर एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, पालिका समिती स्थापन करत तपास करणार

News Desk

पंतप्रधान मोदींमुळेच राफेल करार शक्य, संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला आनंद 

News Desk