HW News Marathi
Covid-19

दिलासादायक ! एकाच दिवसात १४०८ रुग्णांना घरी सोडले, राज्यात एकूण ४१ हजार ६४२ रुग्ण

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ६४२ झाली आहे.आज २३४५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज (२१ मे) १४०८ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ११ हजार ७२६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २८ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख १९ हजार ७१० नमुन्यांपैकी २ लाख ७८ हजार ६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४१ हजार ६४२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ३७ हजार ३०४ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २६ हजार ८६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात ६४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १४५४ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ४१, मालेगाव ९, पुण्यात ७, औरंगाबाद शहरात ३, नवी मुंबईमध्ये २, पिंपरी- चिंचवड -१ तर सोलापुरात १ मृत्यू झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३६ पुरुष तर २८ महिला आहेत. आज झालेल्या ६४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३१ रुग्ण आहेत तर २९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६४ रुग्णांपैकी ३८ जणांमध्ये ( ५९ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १४५४ झाली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी

  • मुंबई महानगरपालिका: २५,५०० (८८२)
  • ठाणे: ३३८ (४)
  • ठाणे मनपा: २०४८ (३३)
  • नवी मुंबई मनपा: १६६८ (३३)
  • कल्याण डोंबिवली मनपा: ६४१ (६)
  • उल्हासनगर मनपा: १३१ (२)
  • भिवंडी निजामपूर मनपा: ८० (३)
  • मीरा भाईंदर मनपा: ३६२ (४)
  • पालघर:१०२ (३)
  • वसई विरार मनपा: ४२५ (११)
  • रायगड: २८५ (५)
  • पनवेल मनपा: २७१ (११)
  • ठाणे मंडळ एकूण: ३१,८५१ (९९६)
  • नाशिक: ११३
  • नाशिक मनपा: ८४ (२)
  • मालेगाव मनपा: ७१० (४३)
  • अहमदनगर: ४७ (५)
  • अहमदनगर मनपा: १९
  • धुळे: १५ (३)
  • धुळे मनपा: ८० (६)
  • जळगाव: २५२ (२९)
  • जळगाव मनपा: ७९ (४)
  • नंदूरबार: २६ (२)
  • नाशिक मंडळ एकूण: १४२५ (९४)
  • पुणे: २५५ (५)
  • पुणे मनपा: ४२०७ (२२२)
  • पिंपरी चिंचवड मनपा: २०३ (७)
  • सोलापूर: १० (१)
  • सोलापूर मनपा:५१२ (२७)
  • सातारा: १८४ (२)
  • पुणे मंडळ एकूण: ५३७१ (२६४)
  • कोल्हापूर:१४१ (१)
  • कोल्हापूर मनपा: २०
  • सांगली: ५४
  • सांगली मिरज कुपवाड मनपा: ९ (१)
  • सिंधुदुर्ग: १०
  • रत्नागिरी: १२३ (३)
  • कोल्हापूर मंडळ एकूण: ३५७ (५)
  • औरंगाबाद:२०
  • औरंगाबाद मनपा: ११०६ (३९)
  • जालना: ४३
  • हिंगोली: ११०
  • परभणी: १५ (१)
  • परभणी मनपा: ३
  • औरंगाबाद मंडळ एकूण: १२९७ (४०)
  • लातूर: ५१ (२)
  • लातूर मनपा: ३
  • उस्मानाबाद: १९
  • बीड: १३
  • नांदेड: ११
  • नांदेड मनपा: ८१ (४)
  • लातूर मंडळ एकूण: १७८ (६)
  • अकोला: २९ (२)
  • अकोला मनपा: ३१५ (१५)
  • अमरावती: ९ (२)
  • अमरावती मनपा: १३१ (१२)
  • यवतमाळ: १११
  • बुलढाणा:३८ (३)
  • वाशिम: ८
  • अकोला मंडळ एकूण:६४१ (३४)
  • नागपूर: ३
  • नागपूर मनपा: ४३४ (६)
  • वर्धा: ३ (१)
  • भंडारा: ९
  • गोंदिया: ३
  • चंद्रपूर: ८
  • चंद्रपूर मनपा: ७
  • गडचिरोली: ७
  • नागपूर मंडळ एकूण: ४७४ (७)
  • इतर राज्ये: ४८ (११)

एकूण: ४१ हजार ६४२ (१४५४)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर बुलडाण्यात संचारबंदी लागू, शाळा महाविद्यालय बंद

News Desk

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता 10 जूनपासून!

News Desk

चिंताजनक : राज्यात आज कोरोना रुग्णांचा उद्रेक!

News Desk